विशेष प्रतिनिधी
बीड : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती शुक्रवारी रात्री खालावली. बीडच्या मेळाव्यानंतर मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली. त्यांना चक्कर येऊ लागले होते. त्यानंतर त्यांना बीड येथील डॉ. सुनील बोबडे यांच्या मेडीकेअर हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. आता 24 तासांसाठी डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांना ठेवण्यात येणार आहे.
मेळाव्यात भाषण करताना प्रकृती साथ देत नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी मनोज जरांगे पाटील यांच्या तपासण्या केल्या. यावेळी रक्ताचे नमुने देखील घेण्यात आले आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ.सुनील बोबडे यांनी सांगितले की, शुक्रवारी रात्री ९.३० वाजता मनोज जरांगे पाटील यांना मळमळ होत होते. त्यांना चक्कर येत होते. थोडे पडल्यासारखे त्यांना झाले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात आणण्यात आले. त्यावेळी त्यांची तपासणी केल्यावर रक्तदाब कमी झाला होता. तातडीने त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.
मनोज जरांगे पाटील मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. त्यासाठी त्यांनी अनेकवेळा उपोषण करत आपल्या मागण्या शासनापुढे ठेवल्या होत्या. त्यांच्या मागण्यानंतर शासनाने शिंदे समितीची नियुक्ती केली होती.
https://youtu.be/3wuRsAsfgs8
Manoj Jarange’s health deteriorates, admitted to hospital
महत्वाच्या बातम्या
- Disha Salian सामुहिक बलात्कार झालेला नाही. डाेक्याला जखम झाल्यानेच मृत्यू , दिशा सालियनचा पाेस्टमार्टमचा रिपाेर्ट समाेर
- आजही माझ्या डोळ्यात पाणी आणि अंगावर काटे, आणिबाणीची आपबिती सांगत मुख्यमंत्र्यांचा काॅंग्रेसवर हल्ला
- Harshvardhan Sapkal : बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीच्या चौकशी अहवालाची लपवाछपवी का?: हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल
- Supreme Court : अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय असंवेदनशील ठरवत सर्वोच्च न्यायालयाची