विशेष प्रतिनिधी
सांगाेला : Shahjibapu उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणे गाणाऱ्या स्टॅंड अप काॅमेडियन कुणाल कामरा याच्या विराेधात आता शिवसेना शिंदे गटाची धडाडती ताेफ असलेले शहाजीबापू पाटील उतरले आहेत. ‘काय डाेंगार, काय झाडी.. डायलाॅगसारखाच ‘मातोश्री के अंगण मे कामरा आया, सुपारी लेके गाना गाया असा डायलाॅग त्यांनी मारला आहे.Shahjibapu
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या एका गाण्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला होता. या गाण्याच्या माध्यमातून त्याने नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली होती, त्यानंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले. कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड करण्यात आली. दरम्यान त्यानंतर आता शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी देखील एक गाणं म्हणत कुणाल कामराला प्रत्युत्तर दिलं आहे. ‘मातोश्री के अंगण मे कामरा आया, सुपारी लेके गाना गाया, उद्धवजी को खुशी आया लेकीन ठाणे का टायगर आखो मे अंगार उबाठा को खत्म करणे महाराष्ट्र के मैदान में आया,’ असं गाणं शहाजी बापू यांनी म्हटलं आहे.
कुणाल कामराच्या विडंबनात्मक गाण्यामुळे राज्यातील 14 कोटी जनतेचं मन दुखावले आहे, त्यामुळे आपन सांगोला येथे कुणाल कामराच्या विरोधात तक्रार दाखल करणार असल्याचे सांगून ते म्हणाले की, महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांना कडक शिक्षा करण्यात यावी, असा कायदा पारित व्हावा यासाठी मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र देणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दरबारी आपले वजन वापरून निधी मिळवून शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावे. ,निवडणूक काळात शेतकऱ्यांना दिलेलं कर्जमाफीचं वचन पूर्ण करावं, आपली फसवणूक झाली अशी भावना शेतकऱ्यांची होऊ नये, अर्थमंत्री अजित पवार हे कधीही खोटं बोलत नाहीत, त्यामुळे त्यांनी तिजोरीची वास्तवता सांगितली आहे तरीही त्यांनी लाडकी बहीण योजना सुरूच ठेवावी. त्याचबरोबर केंद्रातून निधी आणून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणाही लवकरात लवकर करावी अशी मागणी शहाजी बापू पाटील यांनी यावेळी केली आहे.
Matoshree Ke Angan Me Kamra Ayya, Supari Leke Gana Gaya, Commentary on Shahjibapu
महत्वाच्या बातम्या
- Manoj Jarange मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल
- Kunal Kamra कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयाचा दिलासा, अटकेपासून संरक्षण
- Anna Bansode : विधानसभा उपाध्यक्षपदी निवड अन् दोन दिवसात अण्णा बनसोडेंना उच्च न्यायालयाचे हजर राहण्याचे आदेश
- Prashant Koratkar प्रशांत कोरटकर यांच्यावर न्यायालयातच वकिलाचा हल्ला