विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर पाेलीसांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे आमदार राेहित पवार (Rohit Pawar) यांनी गायकवाड यांच्या वक्तव्याचे समर्थन करताना नेरुळ ड्रग्ज प्रकरणात पाेलीसांवर गंभीर आराेप केले आहेत.
गायकवाड यांनी दोन दिवसांपूर्वीच त्यांनी महाराष्ट्र पोलिसांना अकार्यक्षम म्हणत गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी जर 50 लाख पकडले तर ते 50 हजार दाखवतात, असा आरोप त्यांनी केला होता. त्याचे समर्थन करताना रोहित पवार म्हणाले की, आमदार संजय गायकवाड जे म्हणाले आहेत ते खोटं आहे, असं अजिबात नाही. संजय गायकवाड यांनी म्हटले आहे की, पोलिसांना 50 लाखांचा माल सापडला, तर ते दाखवताना कमी दाखवतात आणि वरचे पैसे घेतात. संजय गायकवाड यांना ही गोष्ट माहिती आल्याशिवाय ते असा आरोप करणार नाहीत. त्यामुळे माझी मागणी आहे की, संजय गायकवाड यांनी ज्या पोलिसांवर आरोप केले आहेत, त्यांना शोधून काढा. देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की, नेरुळ ड्रग्ज प्रकरणात एफआयआर दाखल झाला आहे. त्याप्रकरणी त्यांनी बोलावे. कारण नेरुळ ड्रग्ज प्रकरणात पोलीस प्रशासनातील लोकं सहभागी आहेत. 1100 ते 1200 कोटी रुपयांचा ड्रग्जचा व्यवहार आहे. परंतु प्रत्यक्षात वेगळी रक्कम दाखवली आहे. पोलीस प्रशासन यामध्ये सहभागी आहेत.
आमदार संजय गायकवाड हे पोलिसांबद्दल केलेल्या आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत. त्यांनी म्हटले की, मी पोलिसांबाबत जे वक्तव्य केलं आहे, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. मात्र, माझ्या व्यक्तिगत अनुभवावरून मी ते वक्तव्य केलं आहे आणि मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्याशी पोलिसांबाबत केलेल्या वक्तव्यावर चर्चा केली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या वक्तव्यावर एकनाथ शिंदे यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याची माहितीही संजय गायकवाड यांनी दिली आहे.
MLA Rohit Pawar support to Sanjay Gaikwad, made serious allegations against the police
महत्वाच्या बातम्या
- Narhari Zirwal लाडक्या बहिणी 1500 रुपयांत खुश, 2100 रुपये देऊ असे कुणीच म्हटले नाही, नरहरी झिरवाळ यांचा दावा
- Bopdev Ghat : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक
- Devendra Fadnavis : शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
- Devendra Fadnavis : महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती