Chandrashekhar Bawankule मोदींचा साधेपणा मातोश्री टू बांधणाऱ्या उद्धव ठाकरेंना दिसणार नाही, बावनकुळे यांचा टोला

Chandrashekhar Bawankule मोदींचा साधेपणा मातोश्री टू बांधणाऱ्या उद्धव ठाकरेंना दिसणार नाही, बावनकुळे यांचा टोला

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मोदींचा साधेपणा मातोश्री टू बांधणाऱ्या उद्धव ठाकरेंना दिसणार नाही. पंतप्रधान मोदींचे परदेश दौरे विकासासाठी, तर उद्धव ठाकरेंची टीका विनोदासाठी अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सामना अग्रलेखावर टीका करत उध्दव ठाकरेंना टोला लगावला आहे.

बावनकुळे यांनी म्हटले आहे की अडीच वर्षे घरात बसून ‘अतिविलास‘ करणारे उद्धव ठाकरे सामनामधून पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींवर टीका करतात. हा मोठा विनोदच म्हणावा लागेल. विलासी असा आरोप करणाऱ्यांनी पंतप्रधान मोदीजींचा जीवनप्रवास बघावा. एक चहावाला पंतप्रधान होतो, तेव्हा तो त्यांच्या साधेपणानं आणि मेहनतीनंच.

मा. मोदीजींच्या सक्षम नेतृत्वाखालील देशाचा विकास होतोय. मोदीजींनी त्यांच्या राजकीय आणि वैयक्तिक आयुष्यात कायमच साधेपणा जपला आहे. मात्र, त्यांचा साधेपणा ‘मातोश्री टू‘ बांधणाऱ्या उद्धव ठाकरेंना दिसणार नाही. त्यामुळेच ते दिल्लीत शीशमहल बांधणाऱ्या अरविंद केजरीवालांच्या मदतीला धावून आले आहेत.

बावनकुळे म्हणाले, पंतप्रधानांचे परदेश दौरे देशाची प्रतिमा मजबूत करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय संबंध दृढ करण्यासाठी असतात. भेटवस्तूंचा विषय उगाच गाजवून देशातील विकासावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न आहे. भारताचे जागतिक स्थान उंचावले गेले आहे, याचा तुम्हाला खरा त्रास होत आहे.

Modi’s simplicity will not be seen by Uddhav Thackeray, who built Matoshree Two, Bawankule’s criticism

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023