विशेष प्रतिनिधी
नागपूर: नागपुरातील दंगल प्रकरणातील पोलिसांनी सोशल मीडिया अकाउंट्सची तपासणी करून केलेल्या तपासात मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा (एमडीपी) कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनिअर आणि यूट्यूबर मोहम्मद शहजाद खान यांना अटक केली आहे. हिंसाचाराचे प्लॅनिंग सकाळीच झाल्याचे सोशल मीडिया अकाउंट्सच्या चौकशीत पुढे आले आहे.
१७ मार्च रोजी सकाळी हमीद इंजिनिअरने मुजाहिदीनसाठी देणग्या गोळा करण्याचे आवाहन केले होते. त्याला विचारले असता, त्याने गाझाच्या लोकांसाठी देणग्या गोळा करत असल्याचे सांगितले. हिंसाचाराचा कथित सूत्रधार फहीम खान हा हमीदच्या पक्षाचा नेता आहे.
दंगलीत सहभागी असलेल्या व्यक्तींची ओळख पटवून त्यांना अटक करण्यावर आता पूर्ण लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. गुप्तचर यंत्रणेच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला जात आहे. दरम्यान शुक्रवारी संध्याकाळी, पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यात डॉ. सिंगल यांनी शहरातील शांतता प्रस्थापित करण्यावर भर दिला.
अटक झालेल्या आरोपींची संख्या आता १०५ वर पोहचली आहे. त्यात दहा अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. महालमध्ये झालेल्या हिंसाचारामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्राथमिक मुल्यांकणात दंगलीत ६१ वाहनांचे नुकसान झाले आहे. महालच्या हंसापुरीमध्ये १७ मार्च रोजी हिंसाचाराची घटना घडली. हिंसाचार पसरवण्यात सोशल मीडिया महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचेही पोलिसांना आढळून आले. तेव्हापासून पोलिस उपायुक्त लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनाखाली, सायबर पोलिस सोशल मीडिया अकाउंटची चौकशी करत आहेत.
Nagpur violence planned on social media, MDP executive president arrested along with YouTuber
महत्वाच्या बातम्या
- Disha Salian दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना आरोपी करण्याची तिच्या वडिलांची उच्च न्यायालयात याचिका
- Devendra Fadanvis : पुण्यात कोयता गँग नाही पण भाई होण्यासाठी अल्पवयीन मुलांकडून दहशत, मुख्यमंत्र्यांची माहिती
- Hemant Rasne : हिंजवडी दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याची आमदार हेमंत रासने यांची विधानसभेत मागणी
- Eknath Shinde : दोन्ही शिवसेनेत एक्स वॉर, एकनाथ शिंदे राजकीय कीड म्हणाल्याने आदित्य ठाकरेंवर सूर्याजी पिसाळ मनात पलटवार