विशेष प्रतिनिधी
गोंदिया : Nana Patole ज्याप्रमाणे पहलगाम मध्ये धर्म विचारला गेला त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण दुकानदार कडे जाऊन त्यांच्या धर्म विचारावा आणि त्यांना हनुमान चालीसा पठण करायला लावी असे वक्तव्य मंत्री नितेश राणे यांनी दापोलीच्या सभेमध्ये केले. यावरून राणे यांच्यावर वाचाळवीर मंत्री अशी टीका करत भाजप दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करते आहे असा आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहेNana Patole
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की भाजपाने आपल्या वाचाळवीरांना पहावं. एका बाजूला नरेंद्र मोदी एक है तो सेफ आहे असे नारे देतात. असे वक्तव्य करून धर्माधर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम भाजपा करीत आहेत. त्यांच्या वक्तव्याचे परिणाम आज देश भोगत आहेत. ज्याप्रमाणे काश्मीरमध्ये अनेक मुस्लिम बांधवांनी पर्यटकांना वाचवले , त्यांना सहकार्य केलं. एवढेच नाही तर देशभरामध्ये मुस्लिम समाजाने पाकिस्तान मुर्दाबादचे नारे दिले. ज्याप्रमाणे भाजपाचे खासदार, मंत्री वागत आहेत हे चुकीचे आहे.
राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीरमध्ये जाऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. मात्र पंतप्रधान यांनी याकडे दुर्लक्ष करीत बिहारच्या निवडणुकीकडे आपलं लक्ष केंद्रित करण्यात करीत असल्याचा टोला यावेळी नाना पटोले यांनी लगावला.
इंदिरा गांधींनी अशा प्रकारच्या हल्ला जेव्हा भारतावर झाला त्यावेळेस लाहोरमध्ये जाऊन पाकिस्तानची विभागणी केली. हा आपल्या देशावरचा हल्ला आहे. काँग्रेस ही सरकारच्या सोबत असल्याची भूमिका नाना पटोले यांनी मांडले
-एका बाजूला संजय राऊत हे गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनामा मागत आहेत तर शरद पवार यांनी दहशतवादी विरोधी धोरण ठरवावे असे वक्तव्य केले. यावरून गृहमंत्री शहा यांच्या राजीनामावरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद आहेत का यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री आणि असे अनेक नेते आहेत ज्यांच्या कार्य काळामध्ये अशा घटना झाल्या. अशा नेत्यांनी स्वतःहून राजीनामा दिला आहे. त्यामुळे “जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगावी”अशी भूमिका काँग्रेसची आहे. पण त्यांना सत्ताच पाहिजे. गेंड्याच्या कातडीचे असलेले लोक आहेत. झालेल्या घटनेची चूक लक्षात घेऊन याबाबतीत त्यांनी निर्णय घ्यावा. मात्र ज्याप्रकारे देशावर हल्ला झाला आहे त्याला उत्तर देणे फार गरजेचे आहे जेणेकरून पुढे देशावर कोणत्याही प्रकारचा हल्ला होणार नाही अशी काँग्रेसची भूमिका असल्याचे पटोले म्हणाले.
ऑन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
धर्म विचारुन मारलं का याबाबतचं सत्य माहित नाही असे शरद पवार म्हणाले. आधीच्या घटनांमध्ये धर्मावरुन चर्चा नव्हती आता चर्चा का असा सवालही त्यांनी केला. तर पवारांनी मृतांच्या आप्तेष्टांकडून घटना ऐकावी असा सल्ला फडणवीसांनी दिला आहे. यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की त्यांच्या परिवारांना विचारण्यापेक्षा ही घटना झालीच कशी? खरा दोषी कोण ,? याच्यावर फडणवीस यांनी आत्मपरीक्षण करावे.
भाजपाने जो विभाजन वाद निर्माण केला त्याची फळ आम्हाला भोगावे लागत आहे अशी जनमानसाची भावना आहे. यामध्ये आम्हाला पडायचे नाही अशी भूमिका काँग्रेसची आहे. मात्र या घटनेच्या जशास तसे उत्तर द्यावे अशी काँग्रेसची भूमिका आहे.
Nana Patole Alleges Maharashtra Minister Vachalveer is Fomenting Communal Divide
महत्वाच्या बातम्या
- पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधानांवर आरोप करणाऱ्या एआययूडीएफ आमदार अमिनुल इस्लाम यांना अटक
- Muslim Organizations : पाकिस्तानला धडा शिकवा, मुस्लिम संघटनांची मागणी
- PSL Broadcast Stopped : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला भारताचा मोठा झटका; पीएसएलचे भारतात प्रसारण थांबवले
- Michael Rubin : काश्मीर पाकिस्तानच्या गळ्याची नस असेल, तर भारताने आता त्याचा गळाच कापावा, अमेरिकन थिंक टँक सदस्य मायकेल रुबिन यांचा टोला