विशेष प्रतिनिधी
पुणे : Pune शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण मिळवण्यात पोलीस प्रशासन आणि राज्य सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट)च्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले .प्रदेश महिला अध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.Pune
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात पुणे शहरात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती ढासळल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. पोर्शे कार अपघात, कोयता गँगची दहशत, दिवसाढवळ्या गोळीबार, चेन स्नॅचिंग, बलात्कार, विनयभंग, अपघात, खून अशा गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यातच अल्पवयीन मुलांकडे पिस्तूल व कोयत्यासारखी घातक हत्यारे आढळून येत असल्याने पोलिसांवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
शहरात अमली पदार्थांची वाढती तस्करी, टोळीयुद्ध, किरकोळ वादातून होणारे खून यामुळे पुणे गुन्हेगारीच्या विळख्यात अडकत चालले आहे. या परिस्थितीवर कोणतेही नियंत्रण नसल्याचा आरोप करत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले.
राज्य सरकार व गृहखात्याच्या कार्यशैलीचा निषेध करण्यात येणार असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली .
NCP protests against deteriorating law and order in Pune
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray तुमच्या बापाने मुंबई दिली नाही, ती मराठी माणसाने लढून मिळवली, उद्धव ठाकरे यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका
- Uday Samant आता मंत्री उदय सामंत अडचणीत, वडिलांच्या कंपनीने महामार्गाच्या कामात गैरव्यवहार केल्याचा आरोप
- खोटे आरोप करण्याची हिम्मत… धनंजय मुंडे यांचा सुरेश धस यांना इशारा
- क्रूर, लुटारू औरंगजेबाचे खानदानच लुटेरे, बाबा रामदेव म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजच आमचे आदर्श