Ajit Pawar ना यांची जीभ थरथरते ना लाज शरम वाटते, हर्षवर्धन सपकाळ यांचा अजित पवारांवर हल्लाबोल

Ajit Pawar ना यांची जीभ थरथरते ना लाज शरम वाटते, हर्षवर्धन सपकाळ यांचा अजित पवारांवर हल्लाबोल

Ajit Pawar

विशेष प्रतिनिधी

मुंबई : कर्जाचे पैसे भरा. या वर्षी आणि पुढच्या वर्षीही शेतकरी कर्जमाफी होणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.हे बोलताना ना यांची जीभ थरथरते ना यांना लाज शरम वाटते, असे सपकाळ यांनी म्हटले आहे.

अजित पवारांच्या शेतकरी कर्जमाफी होणार नसल्याच्या विधानावर टीका करताना सपकाळ म्हणाले, जनतेने राक्षसी बहुमत देऊन सत्तेवर बसवलेले लोक आता राक्षसाप्रमाणे बोलू वागू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत कर्जमाफी देऊ असे आश्वासन देऊन महायुतीने राज्यातील शेतक-यांची मते घेतली आणि सत्तेवर येताच ३१ मार्च पूर्वी पीक कर्ज भरा, कर्जमाफी मिळणार नाही असे मुजोरपणे सांगत आहेत.

लाडक्या बहिणींची फसवणूक अगोदरच केली आहे. २१०० चे आश्वासन देऊन त्यांच्या हातावर १५०० रुपये टेकवले जात आहेत. विविध कारणे देऊन १० लाखांहून अधिक महिलांना अपात्र करून योजनेचा लाभ बंद केला आहे आणि २१०० रुपये मिळण्यासाठी ५ वर्ष वाट पहावी लागेल असे उद्दामपणे सांगत आहेत, असेही सपकाळ म्हणाले.

विधानसभा निवडणुकीच्या काळात महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र पैशाचे सोंग आणता येत नाही असे सांगत पुढील दोन वर्षे तरी कर्जमाफी होणार नसल्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले.

आर्थिक शिस्त गरजेची असते. मला थोडीशी तरी अक्कल आहे. सगळी सोंग करतात येतात पैशाचे सोंग करता येत नाही. त्यामुळे कर्जाचे पैसे भरा. या वर्षी आणि पुढच्या वर्षीही कर्जमाफी होणार नाही.
आम्ही वास्तववादी भूमिका घेऊन अर्थसंकल्प सादर केला. मी राज्याचा अर्थसंकल्प सादर करतो, मला थोडीशी तरी अक्कल आहे. सगळी सोंग करतात येतात पैशाचे सोंग करता येत नाही, असेही अजित पवारांनी स्पष्ट केले आहे.

Neither his tongue trembles nor does he feel ashamed, Harshvardhan Sapkal’s attack on Ajit Pawar

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023