विशेष प्रतिनिधी
नागपूर : Nitin Gadkari “या देशात पैशाची कमतरता नाही, पण प्रामाणिकपणे आणि कार्यक्षमतेने काम करणाऱ्यांचीच कमतरता आहे,” अशा स्पष्ट शब्दांत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आगामी टोल धोरणाबाबत संकेत दिले आहेत. पुढील १५ दिवसांत देशासाठी नवीन टोल पॉलिसी जाहीर केली जाईल, अशी माहिती त्यांनी वसंत व्याख्यानमालेत दिली.Nitin Gadkari
गडकरी म्हणाले की, टोल प्रणाली अधिक पारदर्शक, कार्यक्षम आणि प्रवाशांना सोयीस्कर कशी करता येईल, यावर सरकार काम करत आहे. “माझं बजेट पूर्वी २.८० लाख कोटी रुपये होतं, ते आता ३ लाख कोटींवर गेलं आहे. त्यामुळे पैशाचा प्रश्न नाही, प्रश्न एवढे पैसे वेळेवर आणि योग्य प्रकारे खर्च का होत नाहीत, हाच खरी चिंता आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
झोजिला बोगद्याच्या संदर्भात बोलताना गडकरी म्हणाले, “१२ हजार कोटींचं बजेट असलेल्या या प्रकल्पाचं काम आम्ही केवळ ५५०० कोटी रुपयांत पूर्ण करत आहोत, ज्यामुळे सुमारे ६५०० कोटींची बचत झाली आहे. आतापर्यंत या प्रकल्पाचं ७० टक्के काम पूर्ण झालं आहे.”
तसेच, मुंबई-गोवा आणि दिल्ली-जयपूर महामार्गही अंतिम टप्प्यात असून, मुंबई-गोवा महामार्ग जून २०२५ पर्यंत १०० टक्के पूर्ण केला जाईल, असं त्यांनी सांगितलं.
देशात पाण्याची नव्हे, तर नियोजनाची कमतरता असल्याकडे लक्ष वेधत, त्यांनी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी परिणामकारक नियोजनाच्या गरजेवर भर दिला.
New toll policy to be announced in the next 15 days, Nitin Gadkari
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis शेतकऱ्यांना पुढील वर्षीपर्यंत १२ तास मोफत वीज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
- Sanjana Ghadi : शिवसेना ठाकरे गट ठराविक गटाच्या ताब्यात; संजना घाडींचा उध्दव ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’ करताना टोला
- लाडक्या बहिणींमुळे निवडून आलो, गुलाबराव पाटील म्हणाले मला गॅरंटी नव्हती
- चंद्रकांत खैरे ढोंगी माणूस, आता त्यांनी नातवंडं सांभाळावीत, संदीपान भुमरे यांची टीका