Nitesh Rane नितेश राणे म्हणाले, सुदैवाने हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे म्हणून!

Nitesh Rane नितेश राणे म्हणाले, सुदैवाने हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे म्हणून!

विशेष प्रतिनिधी

सिंधुदुर्ग : आपल्या देवस्थानच्या जागांवर दावा ठोकत आहेत. वक्फ बोर्ड कायदा आपल्या देशाला इस्लामिक राष्ट्र बनविण्याचे प्रयत्न करत आहे. आज आपल्या देवांकडे हे वाकडे नजरेने पाहण्याची हिंमत करत असतील तर उद्या आपल्या राहत्या घरांना देखील सोडणार नाहीत. सुदैवाने हिंदुत्ववादी विचाराचं सरकार असल्यामुळे हे लोक तेवढी हिंमत करू शकणार नाहीत. आम्ही असं कुठलंही इस्लामिक आक्रमण सहन करणार नाही, असा इशारा मत्स्य उद्योग आणि बंदर मंत्री नितेश राणे यांनी दिला.

पत्रकारांशी बोलताना नितेश राणे म्हणाले, वक्फ बोर्ड कायदा आपल्या देशात आहे. त्याद्वारे आपल्या देशाला इस्लामिक राष्ट्र बनविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आमच्या जवळ असलेली माहिती होती ती आम्ही लोकांसमोर आणली, हा फार मोठा धोका आहे .सुदैवाने देशात आणि राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहेराज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतं तर एवढ्यात जिल्ह्यातील 50 ते 60 टक्के यादीप्रमाणे 156 ठिकाणची जागा देऊन टाकली असती. पण जिल्ह्यातील एक खासदार आणि तिन्ही आमदार हिंदुत्ववादी विचाराचे आहेत

महाविकास आघाडीवर टीका करताना राणे म्हणाले, वक्फ बोर्डने दावा केलेली जागा त्या सरकारने देऊन टाकली असती. या यादीच्या पलीकडे त्यांनी काय मस्ती केली आहे का ते ही आम्ही तपासणार आहोत नागरिकांनी याबद्दलची सविस्तर माहिती घेणे गरजेचे आहे. हे मोठे षडयंत्र आहे. यामधून हिंदू समाजाला आपल्या देशातून कमी कसं करता येईल याचा प्रयत्न आहे. आमचं केंद्र सरकार असेपर्यंत जिल्ह्यातील नागरिकांना शब्द देतो एक इंचही जागा वक्फ बोर्डाला देणार नाही. वक्फ बोर्डाने आपल्या देवस्थानच्या जागेवर दावा ठोकण्याची हिंमत केली असेल तर सिंधुदुर्गातील हिंदू समाजाने यांचा डाव मोडून काढण्याची हिंमत ठेवली पाहिजे

राणे म्हणाले , आज आपल्या देवांकडे हे वाकडे नजरेने पाहण्याची हिंमत करत असतील तर उद्या आपल्या राहत्या घरांना देखील ही लोक सोडणार नाहीत. त्यामुळे या सर्व बाबींचा अभ्यास करून मी ही प्रशासनशी बोलणार आहे. केंद्र सरकारने वक्फ बोर्ड कायद्यामध्ये तरतुदी सुचवल्या आहेत. यांची मुजोरी मोडून काढण्याचे प्रयत्न करणार. देशात रेल्वे, डिफेन्स नंतर वक्फ बोर्ड कडे सर्वात जास्त जमिनीचा ताबा आहे आज आपले एक एक देवस्थानावर ताबा ठोकण्याचा दावा ते करत आहेत. उद्या आंगणेवाडी देवस्थान, कुणकेश्वर देवस्थान, रामेश्वर देवस्थानवर देखील दावा ठोकू शकतात

आपल्या देशात हिंदुत्ववादी विचाराचं सरकार असल्यामुळे आम्ही जागृत आहोत. ही लोक आता तेवढी हिंमत करू शकणार नाहीत. आम्ही असं कुठलंही इस्लामिक आक्रमण सहन करणार नाही, असा इशारा राणे यांनी दिला.

Nitesh Rane said, we are fortunate because there is a Hindutva government!

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023