विशेष प्रतिनिधी
मुंबई : माझ्या आयुष्यात पोस्टर लावायला एक रुपयाही खर्च करत नाही आणि करणार नाही. माझ्या स्वागताला कुत्राही नसतो. पण सध्या ‘झेड प्लस’ सुरक्षा असल्याने कुत्रा यायाला लागला, पण आताच्या राजकीय पदाधिकाऱ्याला तात्कालीक पद मिळाले तरी ‘साला मै तो साहब बन गया’ असे म्हणत फलकबाजी सुरू होते असा टोला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Nitin Gadkari यांनी केले.
ठाण्यातील ब्रम्हाळा ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने सुप्रसिद्ध निवेदक मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांच्या ७५ व्या वाढदिवसा निमित्ताने अमृत गौरव सत्कार सोहळा झाला. यावेळी बोलताना गडकरी म्हणाले की, माझा अपघात झाला होता. तेव्हा दिवंगत रतन टाटा मला भेटण्यासाठी येणार होते. परंतु त्यांना माझ्या निवासस्थानाचा पत्ता मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी मला संपर्क साधला. मी म्हणालो तुमच्या चालकाला मोबाईल द्या. तर ते म्हणाले. मीच वाहन चालवित आहे. इतके मोठे लोक किती साधे होते.
दिवंगत शिवसेना प्रमुख यांच्या जवळ राहण्यामुळे मला त्यांच्या स्वभावाचे अनेक कंगोरे जवळून पाहण्यास मिळाले. परंतु सुधीर गाडगीळ यांनी त्याच्या पलीकडे जाऊन त्यांच्या अंतरंगात जाऊन त्यांची मुलाखत घेतली. सुधीर गाडगीळ सखोल अभ्यास, संशोधन करून मुलाखती घेतल्या. त्यांच्या मुलाखतीमधून मनोरंजन नाही तर प्रबोधन होते असेही ते म्हणाले.
गडकरी म्हणाले,आपली मराठी भाषा खूप समृद्ध आणि संपन्न आहे. मराठी माणसामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या कला आहेत. त्याचे महत्त्व महाराष्ट्रात राहून कधीच लक्षात येत नाही. परंतु मराठी माणूस राज्याबाहेरील कानाकोपऱ्यात किंवा जगात जातो. तेव्हा लक्षात येते आपले वेगळेपण कशात आहे. महाराष्ट्र आणि बंगालमध्ये साहित्य, संस्कृती, कला याचे वेगळे स्वरूप आहे.
Nitin Gadkari said that he doesn’t even have a dog to welcome him, but now
महत्वाच्या बातम्या
- Manoj Jarange मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल
- Kunal Kamra कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयाचा दिलासा, अटकेपासून संरक्षण
- Anna Bansode : विधानसभा उपाध्यक्षपदी निवड अन् दोन दिवसात अण्णा बनसोडेंना उच्च न्यायालयाचे हजर राहण्याचे आदेश
- Prashant Koratkar प्रशांत कोरटकर यांच्यावर न्यायालयातच वकिलाचा हल्ला