Walmik Karad : खुनात नाही, खंडणीही मागितली नाही, वाल्मीक कराडने काेर्टात केली गुन्ह्यातून मुक्त करण्याची मागणी

Walmik Karad : खुनात नाही, खंडणीही मागितली नाही, वाल्मीक कराडने काेर्टात केली गुन्ह्यातून मुक्त करण्याची मागणी

Walmik Karad

विशेष प्रतिनिधी

Beed News: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची वाल्मीक कराडने (Walmik Karad) कोर्टात अर्ज दाखल केला आहे. मी खुनाच्या प्रकरणात नाही. खंडणी मागितली नाही. माझा या गुन्ह्याशी काही संबंध नाही त्यामुळे मला यातून मुक्त करावे अशी मागणी करणारा अर्ज आज कोर्टात दाखल केला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आजची सुनावणी संपली असून येत्या २४ तारखेला या प्रकरणी सुनावणी घेण्यात येणार आहे. आजच्या सुनावणीत सरकारी विशेष वकिलांकडून काही कागदपत्रे सादर करण्यात आली. त्यात देशमुखांच्या मारहाणीचा व्हिडिओ कोर्टात दिला आहे. परंतु हा व्हिडिओ बाहेर प्रसिद्ध होऊ नये, जर झाला तर त्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी विनंती संतोष देशमुखांच्या बाजूने युक्तिवाद करणारे ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी कोर्टात केली.

आजच्या सुनावणीबाबत उज्ज्वल निकम यांनी म्हटलं की, न्यायालयाने आरोपींना त्यांचे म्हणणं मांडायला सांगितले आहे. येत्या २४ एप्रिलला त्यावर सुनावणी होईल. आजच्या सुनावणीत आरोपी वाल्मीक कराडची चल-अचल संपत्ती जप्त करण्यात यावी असा अर्ज कोर्टात दिला आहे. त्यावर वाल्मीककडून खुलासा दाखल करण्यात आला नाही. त्यानंतर यावर रितसर सुनावणी होईल.
सीआयडीने काही महत्त्वाची कागदपत्रे गोळा केली आहे. कराडसोबत इतर आरोपींच्या संपत्तीची चौकशी सुरू आहे. पुढील तपास सुरू असल्याने पूर्ण तपास झाल्यानंतर संपत्तीबाबत निर्णय घेण्यात येईल. मकोका कायद्यातंर्गत कराडची संपत्ती जप्त करावी असा अर्ज आम्ही दिला आहे. कोर्टात पुरावे नोंदवले जातील असं निकम यांनी म्हटलं आहे.

Not in murder, did not ask for ransom, Walmik Karad demanded to be released from the crime in the court

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023