विशेष प्रतिनिधी
मुंबई : केवळ झटका मांसाची विक्री करणाऱ्या मटण दुकानांना मल्हार सर्टिफिकेट देणार असल्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरविकास मंत्री नितेश राणे यांनी सांगितले आहे. मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉमच्या माध्यमातून फक्त हिंदू समाजातील खाटीकांना हे सर्टिफिकेट मिळणार आहे. मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथे मांस (खरेदी करू नका, असे आवाहन नितेश राणे यांनी केले आहे.
मल्हार सर्टिफिकेशनच्या माध्यमातून आपल्याला आपल्या हक्काची मटण दुकानं उपलब्ध होतील व 100 टक्के हिंदू समाजाचा प्राबल्य असेल व विकणारा व्यक्ती देखील हिंदू असेल. कुठेही मटणामध्ये भेसळ झालेले आढळणार नाही.
मल्हार सर्टिफिकेशनचा वापर जास्तीत जास्त करावा किंबहुना जिथे मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथे मटण खरेदी करू नये असं आवाहन यानिमित्ताने मी करतो. या प्रयत्नांमुळे हिंदू समाजातील तरुण आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील, हे निश्चित, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.
Now separate mutton shops for Hindus, Malhar certificate for Jhakta method : Nitesh Rane
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray तुमच्या बापाने मुंबई दिली नाही, ती मराठी माणसाने लढून मिळवली, उद्धव ठाकरे यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका
- Uday Samant आता मंत्री उदय सामंत अडचणीत, वडिलांच्या कंपनीने महामार्गाच्या कामात गैरव्यवहार केल्याचा आरोप
- खोटे आरोप करण्याची हिम्मत… धनंजय मुंडे यांचा सुरेश धस यांना इशारा
- क्रूर, लुटारू औरंगजेबाचे खानदानच लुटेरे, बाबा रामदेव म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजच आमचे आदर्श