विशेष प्रतिनिधी
मुंबई : Anjali Damania पंकजा आणि धनंजय मुंडे यांच्या समर्थकांकडून माझ्यावर अश्लील कॉमेंट्स करायला सुरुवात केली आहे. मला पहिल्या दिवशी ७०० ते ८०० फोन आले, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.Anjali Damania
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी दमानिया यांनी आंदोलन सुरू केलं आहे. बीडमधील शासकीय कार्यालयात अनेक वरिष्ठ पदावर परळीतील वंजारी समाजातील लोक असल्याचा दावा त्यांनी काही पुराव्यांआधारे केला होता. यावरून आता अंजली दमानिया यांच्या विरोधात वंजारी समाज आक्रमक झाला आहे.
मात्र यावरून दमानिया यांनी थेट धनंजय आणि पंकजा मुंडे यांच्यावर आरोप केले आहेत. पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या, दोन दिवसांपूर्वी मी माध्यमांशी बोलताना काही विधानं केली होती. बीडच्या वरिष्ठ पदावर सर्व वंजारी समाजाची लोक आहेत, असं मला अभ्यासातून समजलं होतं. वंजारी समाजाच्या लोकांना मोठ्या प्रमाणात प्रशासनात घेण्यात आलं होतं.
काही काळाने त्या सर्वांना बीडमध्ये बलावण्यात आलं. हे विधान कुठेही समाजाविरोधात बोलले नव्हते. मी कधीही कोणत्याही समाजाविरोधात बोलत नसेन तर मी जर आता बोलले तर ते का बोलले? मी ट्वीटरवर दोन ट्विट्सही टाकले. भगवान बाबांसारखे संत होते, ते शैक्षिणिक, सांस्कृतिक प्रबोधन करायचे, ते नेहमी वंदनीय आहेत, मी कुठेही हा समाज कष्टाळू नाही, आळशी आहे असं एका चकार शब्दाने म्हटलं नाही. पण त्यातील माझा उल्लेख काढून काही लोकांनी समाजातील सर्व लोकांना पाठवण्याचं काम मोठ्या प्रमाणावर केलं. त्यामुळे मला आता सातत्याने फोन येत आहेत. मी अभ्यासपूर्वक बोलले होते. उच्च पदावरील माणसं फक्त परळीमधील का? असा माझा सवाल होता.
दमानिया म्हणाल्या, नरेंद्र सांगळे यांचा काही वेळापूर्वी मला फोन आला होता. हा माणूस उठसूठ फोन करत सुटलाय. त्यांनी माझा फोननंबर फेसबूकवर टाकलाय. तसंच, काही पोस्ट केल्या असून खालच्या दर्जाची भाषा वापरली आहे. सुनील फड हे धनंजय मुंडे यांचे समर्थक आहेत. त्यांच्या सोशल मीडियावर ते समर्थक असल्याचं दिसतंय. माझ्याविरोधात त्यांनी अश्लील कॉमेंट्स करायला सुरुवात केली आहे. मला पहिल्या दिवशी ७०० ते ८०० फोन आले. आज चौथा दिवस आहे. मी मॉरिशसला स्कुबा डायविंगला गेले होते. त्यातील एक फोटो फेसबूकवर टाकून अश्लील कमेंट्स केली. हे सर्व धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते आहेत.
Obscene comments by Pankaja and Dhananjay Munde supporters, Anjali Damania alleges
महत्वाच्या बातम्या
- विखे पाटील यांनी सांगितले कधी होणार धनंजय मुंडे यांचा राजीनामा
- Girish Mahajan : काँग्रेससह सर्वच पक्षातील नेते येण्यासाठी नंबर लावून बसलेत, गिरीष महाजन यांचा मोठा दावा
- Narahari Zirwal: दैवताला सोडून जाताना लाज वाटली नाही का?; जितेंद्र आव्हाड यांचा नरहरी झिरवळ यांना सवाल
- Chief Minister Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांचा बनावट व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांची ओळख पटली