विशेष प्रतिनिधी
पंढरपूर: पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी गेलेल्या भाविकांना अनेक तास रांगेत उभे राहावे लागते. मात्र आता पूजा करण्यासाठीची हजारो भाविकांची प्रतीक्षा आता संपली आहे. आता घरबसल्या आँनलाईन बुकिंग करता येणार आहे.
नवीन वर्षातील पहिल्या तीन महिन्यांसाठी येत्या 1 जानेवारी रोजी विठ्ठल रुक्मिणीच्या तुळशीपूजा, नित्यपूजा आणि पाद्यपूजेसाठी ऑनलाईन बुकिंग सुरु केले जाणार आहे. भाविकांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अधिकृत संकेत स्थळावरच आऑनलाईन बुकिंग करावे असे आवाहन मंदिर समितीकडून करण्यात आले आहे. भाविकांना आता घर बसल्या पूजेची नोंदणी करता येणार आहे.
- मंत्रिमंडळाचे खाते वाटप अखेर जाहीर, बावनकुळे महसूल मंत्री, शिंदेंकडे नगर विकास आणि सार्वजनिक बांधकाम
विठ्ठल आणि रुक्मिणीच्या नित्य, तुळशी आणि पाद्यपूजेमध्ये पारदर्शकता आणि सुसूत्रता यावी यासाठी मंदिर समितीने प्रथमच ऑनलाईन बुकिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. तशी यंत्रणा देखील कार्यान्वीत केली आहे. नव्या वर्षातील विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या सर्व पूजांचे बुकिंग हे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. भाविकांमधून मंदिर समितीच्या या नव्या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.
Online booking for Pandharpur Vitthal Puja will be start
महत्वाच्या बातम्या
- PM मोदींना कुवेतचा सर्वोच्च सन्मान, ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर प्राप्त करणारे पहिले भारतीय पंतप्रधान
- Ajit Pawar : भुजबळांचे जहाँ नहीं चैना वहा नहीं रहना वर अजित पवार म्हणाले….
- राज – उध्दव ठाकरे नात्यात संजय राऊतांचा बिब्बा, म्हणाले मोदी, शहा, फडणवीस राज यांचे आयडॉल
- वाळू माफियांची दादागिरी मोडून काढणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा