विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : Chandrakant Khair उद्याेग मंत्री उदय सामंत यांनी येत्या महिन्याभरात शिवसेना ठाकरे गटाचे अनेक नेते शिंदे गटात प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. या टप्प्यातील ऑपरेशन टायगरमध्ये पहिला माेहरा छत्रपती संभाजीनगर येथून चंद्रकांत खैरे यांच्या रुपाने गळाला लागणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.Chandrakant Khair
गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत अनेक घडामोडी घडत आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेतील नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यानंतर आता शिंदे गटाचे नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी खैरे यांना खुली आणि अधिकृत ऑफर दिली आहे. खैरे यांच्यासाठी आमच्या पक्षाचे दरवाजे नेहमी खुले असतील, असे शिरसाट यांनी म्हटले आहे.
शिरसाट म्हणाले “चंद्रकांत खैरे याच्याबद्दल मला कधीही वैयक्तिक राग नाही. त्यांनी प्रामाणिकपणे पक्षाची सेवा केलेली आहे. त्यामुळेच मी आधीही सांगितलं आहे की त्यांच्यासाठी आमच्या पक्षाचे दरवाजे खुले आहे. इतरांसाठी दरवाजे खुले नाहीत. मी त्यांच्या समोर ही अधिकृत ऑफर देत आहे. आम्ही हिंदुत्त्वाची कास घेतलेली आहे. आम्ही बाळासाहेबांचे विचार चालवलेले आहेत, हे खैरे यांनी मान्य केलेले आहे. त्यामुळेच खैरे यांचा आता आमच्यावर राग नाही. आमचाही फक्त खैरेंवर राग नाही. आता कोणती कास धरायची हे खैरे यांनी ठरवलं पाहिजे.
खैरे यांना नेहमी अडचणीतच टाकण्यात आलं. त्यांना दोन वेळा लोकसभा निवडणुकीत पाडण्यात आलं. त्यांचा जाणूनबुजून कार्यक्रम करण्यात आला आहे. त्यामुळे मातोश्री सोडता येत नाही आणि संभाजीनगरात त्यांना कोणी जवळ करत नाही, अशी खैरे यांची अवस्था झालेली आहे,” असेही शिरसाट म्हणाले.
दरम्यान, आपण बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट शिवसैनिक आहाेत. काहीही झाले तरी ठाकरेंची साथ साेडणार नाही, असे खैरे यांनी म्हटले आहे.
Operation Tiger starts again…Shinde group started with Chandrakant Khair
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis महसूल विषयक सुधारित कार्यपद्धतींची अंमलबजावणी 15 ऑगस्टपासून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
- Raj Thackeray : मराठीचा आग्रह धरा, पण आंदोलन थांबवा, राज ठाकरे यांचे मनसैनिकांना आदेश
- Hasan Mushrif : पुण्यासारख्या घटना टाळण्यासाठी ‘महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना’ लागू करा, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची मागणी
- Sanjay Raut संजय राऊत यांनी सोडली टीकेची पातळी, मोदी शहांचा मियाँ म्हणून उल्लेख