विशेष प्रतिनिधी
परभणी : परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ठेवलेल्या संविधानाची एका माथेफिरुने विटंबना केली. या घटनेनंतर परभणी शहरातील आंबेडकरी अनुयायी संतप्त झाले आहेत. आज परभणी बंदची हाक देण्यात आली होती. मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. काही आंदोलकांकडून दुकानांची जाळपोळ करण्यात आली. यानंतर पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. यामुळे सध्या परभणीत तणावपूर्ण स्थिती आहे.
परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. या पुतळ्यासमोर संविधानाची, घटनेची प्रत ठेवण्यात आली आहे. काल मंगळवारी (१० डिसेंबर) एका माथेफिरूने संध्याकाळी 5.30 च्या सुमारास संविधानाच्या प्रतीची विटंबना केली. संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्याला उपस्थितांकडून जोरदार चोप देण्यात आला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
या घटनेच्या प्रतीची विटंबना झाल्यानतंर आंबेडकर अनुयायी संतप्त झाले. या घटनेनंतर काल आंबेडकरी अनुयायींकडून आंबेडकर पुतळा परिसरात जोरदार निदर्शने करण्यात आली. आंदोलकांकडून काल रेल रोकोही करण्यात आला. यानतंर रात्री उशिरापर्यंत परभणीत आंदोलन सुरु होते.
आज परभणी बंदची हाक देण्यात आली होती. यावेळी जिंतूर रोडवरील विसावा फाटा येथे आंबेडकरी अनुयायांनी रास्तारोको देखील केला होता. आता हे आंदोलक आक्रमक झाले असून त्यांनी दुकाने, रस्त्यावर गाड्यांची जाळपोळ करण्यास सुरुवात केली. तर काही ठिकाणी दगडफेक करण्यात आली.
यानंतर काही आंदोलक महिलांनी पोलिसांवरही दगडफेक केली. यानंतर पोलिसांनीही अश्रूधुराच्या नळकांड्या फोडत आक्रमक झालेल्या आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र परभणीतील आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे दिसत आहे. सध्या पोलिसांकडून आंदोलकांना शांत राहण्याचे आवाहन केले जात आहे. तसेच सध्या परभणीत दंगल नियंत्रण पथकही दाखल झाले आहे.
याबाबत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले, परभणीत झालेला प्रकार निंदनीय आहे. बाबासाहेब यांच्याबद्दल सगळ्यांना आदर आहे. अशा संतप्त प्रतिक्रिया येणे अपेक्षित आहे. बाबासाहेब यांच्या पुतळ्या बाबत घडलेली घटना अनेक दिवसांनी घडली आहे. अनेक ठिकाणी बाबासाहेब यांचे पुतळे आहेत. ते उभे करण्यात मराठा समाजाचा देखील मोठा सहभाग आहे. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, शिवाजी महाराज या कोणत्याही महापुरुषाच्या पुतळ्यांची विटंबना होऊ नये. यामामगे ज्याचा हात असेल त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. मुख्यमंत्री या प्रकारांची चौकशी करून आरोपींना शिक्षा करतील हा विश्वास आहे.
Parbhani bandh turns violent
महत्वाच्या बातम्या
- Pankaja Munde : पंकजा मुंडेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; मराठवाड्यातील समस्यांवर, कामगारांच्या स्थलांतरावर चर्चा
- Rahul Narvekar : राहुल नार्वेकर पुन्हा होणार विधानसभा अध्यक्ष; फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत दाखल केला अर्ज
- Jaishankar : जयशंकर म्हणाले- रशिया-युक्रेन चर्चा भारतामार्फत सुरू; आम्ही कधीही डी-डॉलरायझेशनचा पुरस्कार केला नाही
- Mohan Bhagwat : ‘गीता हा म्हातारपणीच वाचण्यासारखा ग्रंथ नाही, लहानपणापासून वाचा’