विशेष प्रतिनिधी
पुणे : Medha Kulkarni महिला आघाडीने केलेल्या आंदोलनावर केलेल्या टीकेवरून भाजपच्या पुण्यातील दोन्ही प्रमुख नेत्यांनी खासदार मेधा कुलकर्णी यांना सुनावले आहे. महिला आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिकाही त्यांनी घेतली आहे.Medha Kulkarni
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयावरून भाजपमध्ये वाद उफाळून आला आहे. दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाच्या विरोधात आंदोलन करताना डॉ. सुश्रुत घैसास यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या दवाखान्याची भाजपच्या महिला मोर्चाने तोडफोड केली होती. भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा हर्षदा फरांदे यांच्यासह महिला कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले होते. त्यांच्या या तोडफोडीवर भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत शहराध्यक्ष धीरज घाटे यांना संबंधित कार्यकर्त्यांना समज द्यावी, असे पत्र पाठविले होते. मात्र, शहर भाजपच्या बैठकीत महिला आघाडीच्या आंदोलनाचे समर्थन करण्यात आले.
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या घरातील प्रश्नांसाठी नाही, तर संघटनेसाठी आंदोलन केले होते. आंदोलन करताना ते चुकीच्या पद्धतीने झाले असले, तरी त्यांचे मनोबल खच्ची करू नये.
केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनीही आंदोलनाचे समर्थन करताना म्हटलं, “19 वर्षांपूर्वी आंदोलन करताना माझ्याकडून तोडफोड झाली होती, ती चुकीचीच होती. मात्र, कार्यकर्ता म्हणून पक्ष माझ्याबरोबर राहिला. तुम्ही जशास तसे उत्तर द्यायला शिका, असे सांगत एखादा आपल्या पक्षाचा नेता चुकीचे सांगत असेल, तर तुम्ही चुकीचे बोलताय हे स्पष्टपणे सांगा.”
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ, खासदार मेधा कुलकर्णी, शहराध्यक्ष घाटे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे आणि पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत भाजपची मंगळवारी रात्री बैठक पार पडली. पक्षाची बैठक सुरू होण्याआधी पासून खासदार मेधा कुलकर्णी बैठकीला उपस्थित होत्या. परंतु, मंत्री पाटील आणि त्यापाठोपाठ मंत्री मोहोळ बैठकीला आल्यावर त्यांची भाषणे होण्यापूर्वीच खासदार कुलकर्णी बैठक अर्धवट सोडून निघून गेल्याचे उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
Party supports women’s front, leaders scold Medha Kulkarni
महत्वाच्या बातम्या