विशेष प्रतिनिधी
मुंबई : सुरवातीपासून अडीच वर्ष शिव्या शाप देणाऱ्यांचे तोंड महाराष्ट्रातल्या जनतेने बंद केले आहे. आमचे ५७ उमेदवार धनुष्यबाणावर निवडून आले. जनतेच्या न्यायालयात गेल्यावर घरी बसणाऱ्यांना कायमच घरी बसवलं आहे, असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला.
शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिंदे म्हणाले, अनेक लोकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. नवी मुंबई,पालघर,मुरबाड, नाशिकच्या कार्यकर्त्यांचा यामध्ये समावेश आहे. प्रत्येक जिल्हा, तालुक्यातून शिवसैनिक येत आहेत त्यांचं मनापासून स्वागत करतो. शिवसेना पक्ष वाढीसाठी हे सगळे माझ्या सोबत आले आहेत. शिवसेना आणि बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जात आहे. अडीच वर्षात विकासाची कामे केली. बाळासाहेबांचे विचार घेऊन हे सर्व पुढे घेऊन जातील
शिंदे म्हणाले, ज्यांनी म्हटलं होते जनतेच्या न्यायालयात जाऊ आणि सांगितलं होते खरी शिवसेना कोणाची त्यांना उत्तर मिळाले आहे. बाळासाहेब आणि आनंद दिघे यांचे विचार कोण पुढे घेऊन जात आहे स्पष्ट झाले आहे. जनतेच्या न्यायालयात शिवसेना आणि धनुष्यबाण यावर शिक्कमोर्तब झाला आहे. आपण सर्व सामान्य माणसांना न्याय देणारी आपली संघटना आहे . मी आधीच सांगितलं होत २०० लोकं निवडून आणू नाहीतर शेती करायला जाऊ आणि आम्ही २०० च्या वर निवडून आणले. शिवसेना अधिक मजबूत होत आहे.
people of Maharashtra shut the mouths of those who insulted and cursed, Eknath Shindes critisism
महत्वाच्या बातम्या
- विखे पाटील यांनी सांगितले कधी होणार धनंजय मुंडे यांचा राजीनामा
- Girish Mahajan : काँग्रेससह सर्वच पक्षातील नेते येण्यासाठी नंबर लावून बसलेत, गिरीष महाजन यांचा मोठा दावा
- Narahari Zirwal: दैवताला सोडून जाताना लाज वाटली नाही का?; जितेंद्र आव्हाड यांचा नरहरी झिरवळ यांना सवाल
- Chief Minister Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांचा बनावट व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांची ओळख पटली