विशेष प्रतिनिधी
नाशिक : Manikrao Kokate कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगित देण्याच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी १८ मार्च रोजी उच्च न्यायालयामध्ये पहिली सुनावणी होणार आहे. वकील तथा माजी न्यायाधीश असलेले सतीश वाणी याचिका दाखल केली आहे.Manikrao Kokate
सतीश वाणी यांनी माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात याचिका दाखल केली. त्यांनी न्यायालयाने कोकाटेंच्या शिक्षेवर स्थगिती दिल्यावर आक्षेप घेत ही याचिका दाखल केली. त्यांनी सांगितले की, ‘वाईट लोकांची वाईट खेळी आहे. घाई गर्दीत कोकाटे यांचा निकाल दिला आहे. इतर लोकांना बाजू मांडू दिली नाही. एकीकडे खोटं सांगून सदनिका घेतात. दुसरीकडे ३० लाख वाटायला लागतात त्यासाठी बंदूक लायसन्स मागितले.
कोकाटे यांना शिक्षा दिली आहे तर त्याला स्थगिती कशी दिली.’ असा सवाल सतीश वाणी यांनी उपस्थित केला आहे. ‘दंड तर भरलेला आहेच ना? कारवाई व्हायला पाहिजे होती. लिली थॉमसन यांच्याप्रमाणे राज्यपाल कारवाई करणार की नाही. मी स्वतः राज्यपाल यांच्याकडे पत्रव्यवहार करणार आहे. कोकाटे यांचे गोव्याला हॉटेल आहेत. ३० लाख महिन्याला वाटतात. आम्ही निकालाच्या विरोधात उच्च न्यायालयात गेलोय. चुकीचा निर्णय दिला आहे. न्यायालयाने दिलेल्या निकालाशी आम्ही सहमत नाही. सुनील केदार प्रकरणात २१ प्रकरणाचे निर्णय आहे. २ वर्षापेक्षा जास्त शिक्षा असेल त्यांना आमदारकीला उभं करू नये असे फाळके मॅडमने म्हटलं आहे. ज्यांनी निकाल दिला अशा न्यायाधीशाने समाजकार्य करावे. कशाला पगार घेऊन काम करतात.
माणिकराव कोकाटे यांना ट्रायल कोर्टाने दिलासा देताना महत्वाची टिपण्णी केली होती. माणिकराव कोकाटे यांना शिक्षा झाली असती तर ते अपात्र झाले असते. अपात्र झाले असते तर पोटनिवडणुक घ्यावी लागली असती, आणि जनतेचा पैसा खर्च झाला असता. खर्च टाळण्यासाठी माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला ट्रायल कोर्टाने स्थगिती दिली.
Petition filed in High Court against decision to suspend sentence of Agriculture Minister Manikrao Kokate
महत्वाच्या बातम्या
- Anjali Damania : हे सर्व जण तुमच्याच तालमीत तयार, तुम्हीच मोठे केलेत, अंजली दमानिया यांनी शरद पवारांना सुनावले
- Harshvardhan Sapkal सत्ताधारी पक्षातील लोकांकडून दहशत, हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
- महाराष्ट्रातला विद्रोह संपून टाकायचा आहे, महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयकावरून जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
- Devendra Fadanvis : बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा विस्ताराचा निर्णय!