Ajit Pawar : चांगल्या भावनेने योजना, पण विकृत प्रवृत्तींकडून गैरफायदा, अजित पवार यांची खंत

Ajit Pawar : चांगल्या भावनेने योजना, पण विकृत प्रवृत्तींकडून गैरफायदा, अजित पवार यांची खंत

Ajit Pawar

विशेष प्रतिनिधी

पुणे : Ajit Pawar कोणतही सरकार चांगल्या भावनेने योजना आणते. पण काही प्रवृत्ती विकृत असते ते त्याचा गैरफायदा घेतात, अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. Ajit Pawar

राज्यातील कृषी विमा योजनेत अनेक जणांनी चुकीच्या पद्धतीने पैसे लाटले असल्याच्या तक्रारी होत आहेत. त्याचबरोबरमहिला असल्याचे भासवून पुरुषांनीच लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटल्याचा प्रकार समोर आला आहे. जवळपास ३८ खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले आहेत. त्याच बरोबर निकषात बसत नसतानाही अनेक जणींनी पैसे घेतल्याचे समोर आले आहे. याबाबत बोलताना पवार यांनी ही खंत व्यक्त केली. ते म्हणाले, मागच्या वेळी मर्यादित वेळ होता आधारकार्ड सीलींग करायच होतं. ते करता आलं नाही.



कोणतही सरकार चांगल्या भावनेने योजना आणतं. कारण काही प्रवृत्ती अशा विकृत असतात की त्याच्यातून गैरफायदा घेतात .त्यामध्ये पारदर्शकता कशी आणता येईल त्यामध्ये आम्ही लक्ष देत आहोत

लाडक्या बहिणींना पैसे द्यायचे आहेत त्यासाठी हे केलं जाईल.

बांगलादेशी घुसखोरीबाबत पवार म्हणाले, हा प्रश्न देशामध्ये सगळीकडेच उत्पन्न झालेला आहे. विशेषता मुंबई, पुणे, कोलकत्ता येथे हे लोक येत आहेत. त्यांना परत पाठवण्याच काम सुरु आहे. सैफ अली खानवर हल्ला करणार देखील बांगलादेशीच होता.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी झालेल्या चारचेबाबत ते म्हणाले, साखर व्यवसायाकरिता ज्या सुधारणा करायच्या आहेत, कोणते प्रश्न आहे त्यावर चर्चा झाली. त्यात सहकार खातं, एक्साईज, कृषी, उर्जा हे विषय होते.

बीड प्रकरणात गुन्हेगार असतील त्यांची चौकशी करुन शिक्षा दिली जाईल .तसेच पालकमंत्री पदाबाबतमुख्यमंत्री आल्यानंतर यावर ते निर्णय करतील तो त्यांचा अधिकार आहे, असे त्यांनी सांगितले.

Plans with good intentions, but benefited from perverted tendencies, regrets Ajit Pawar

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023