विशेष प्रतिनिधी
बीड : Ujjwal Nikam बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुनावणी पार पडली. यावेळी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी युक्तीवाद केला. यावेळी उज्जवल निकम यांनी संतोष देशमुख प्रकरणात नेमकं काय काय झालं? याचा खुलासा केला आहे. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतली नाही असे निकम यांनी न्यायालयाला सांगितलं.Ujjwal Nikam
उज्जवल निकम यांनी कोर्टात तब्बल 32 मिनिटं युक्तीवाद केला. त्यावेळी वाल्मिक कराडने सुदर्शनला फोनवर काय सांगितलं? यावर निकम म्हणाले,
6 डिसेंबर रोजी सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे हे साडेबारा वाजता आवाजा कंपनीच्या मस्साजोग येथील ऑफिसमध्ये आले. सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ केली मारहाण केली. दोन कोटीची मागणी पूर्ण करा किंवा काम बंद करा, असं सुदर्शन घुले याने धमकावलं. हा वाद मिटवण्यासाठी सरपंच संतोष देशमुख आणि गावातील काही लोक आले आणि यावेळी सुदर्शन घुले याने संतोष देशमुख यांना धमकी दिली. दुपारी दीड वाजता पोलीस घटनास्थळी दाखल झाले व घुले व इतर आरोपींना ताब्यात घेऊन गेले. पण या सर्व आरोपीला प्रत्येक्ष अटक 7 डिसेंबर रोजी पहाटे दाखवण्यात आली.
सुदर्शन घुले याने 7 डिसेंबर 2024 रात्री आठ वाजता वाल्मीक कराड याला फोन केला आणि घडलेली संपूर्ण हकीकत सांगितली. यावेळी कराड याने अडथळा आणतील त्यांना संपवा असं सांगितलं होतं, अशी कबुली सुदर्शन घुले याने दिली आहे. त्याचे सीबीआर आणि इतर पुरावे सादर केले आहेत, असं उज्जल निकम यांनी युक्तीवादात सांगितलं. 8 डिसेंबर रोजी विष्णू चाटे सुदर्शन घुले व अन्य एक गोपनीय साक्षीदार असे सर्वजण केज मांजरसुंबा रोड वर नांदूर फाटा येथे तिरंगा हॉटेल वर रात्री नऊ वाजेच्या सुमारास एकत्रित भेटले व त्यांची बैठक झाली. यावेळी विष्णू चाटे संतापला होता.
, विष्णू चाटे यांनी वाल्मीक कराड यांचा मेसेज सुदर्शन घुलेला दिला. या संपूर्ण प्रकरणाचे टॉवर लोकेशन व इतर पुरावे सादर केले आहेत, असं उज्जवल निकम यांनी कोर्टात सांगितलं. त्यानंतर 9 डिसेंबर 2024 दुपारी साडेतीन वाजता संतोष देशमुख केस बीड रोडवर उमरी फाटा टोल नाका येथून अपहरण करून क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. आमच्यावर यापूर्वीही केसेस आहेत, अशा धारणा होत्या. चार्ज फ्रेमसाठी ही केस तयार आहे, असा तब्बल 32 मिनिट युक्तिवाद उज्वल निकम यांनी केला.
Police Did Not Take Santosh Deshmukh Case Seriously: Ujjwal Nikam’s Argument in Court
महत्वाच्या बातम्या
- Disha Salian सामुहिक बलात्कार झालेला नाही. डाेक्याला जखम झाल्यानेच मृत्यू , दिशा सालियनचा पाेस्टमार्टमचा रिपाेर्ट समाेर
- आजही माझ्या डोळ्यात पाणी आणि अंगावर काटे, आणिबाणीची आपबिती सांगत मुख्यमंत्र्यांचा काॅंग्रेसवर हल्ला
- Harshvardhan Sapkal : बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीच्या चौकशी अहवालाची लपवाछपवी का?: हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल
- Supreme Court : अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय असंवेदनशील ठरवत सर्वोच्च न्यायालयाची