विशेष प्रतिनिधी
बारामती : Ram Shinde विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या बारामती दौऱ्याप्रसंगी सुरक्षा व राजशिष्टाचारात कसूर झाल्याच्या प्रकार समोर आला आहे.या प्रकरणात तीन पोलीस अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात आली. दोषी पोलीसांवर दोन हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. एक वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि तीन पोलीस अधिकारी आणि चार पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.Ram Shinde
राम शिंदे यांच्या 15 व 16 मार्च रोजीच्या बारामती दौऱ्यादरम्यान गंभीर स्वरुपाच्या सुरक्षा विषयक त्रुटींसंदर्भात चौकशीअंती कर्तव्यात कसूर केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. दोषी पोलीसांना दोन हजार रुपये दंड बजावण्यात आला आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी यासंदर्भात पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांना चौकशी करुन वस्तूनिष्ठ अहवाल सादर करण्याबाबत कळवले होते. त्यानुसार चौकशी करण्यात आल्यावर गंभीर स्वरुपाच्या त्रुटी दिसून आल्या आहेत.
प्रवीण बाळासाहेब मोरे, पोलीस निरीक्षक जिल्हा विशेष शाखा, पुणे ग्रामीण, रविंद्र कोळी, राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय, पुणे ग्रामीण, वैशाली पाटील, पोलीस निरीक्षक, बारामती तालुका पोलीस ठाणे यांचेकडून कर्तव्यात कसूर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबतचा अहवाल विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर यांच्या कार्यालयास प्राप्त झाला. त्यानुसार कसूर केलेल्यांवर कारवाई करण्यात येत आहे.
सुवर्णा गायकवाड, परिविक्षाधीन महिला पोलीस उपनिरीक्षक, बारामती तालुका पोलीस ठाणे , शामराव यशवंत गायकवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल, पोलीस मुख्यालय पुणे ग्रामीण, रोहित दिलीप वायकर, पोलीस शिपाई पोलीस मुख्यालय पुणे ग्रामीण, श्रीमती सारिका दादासाहेब बोरकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल जिल्हा विशेष शाखा, पुणे ग्रामीण 5) श्री.वसंत सखाराम वाघोले, सहाय्यक फौजदार, पुणे ग्रामीण यांनी देखील कर्तव्यात कसूर केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांचेकडून त्यांना दंडनीय कारणे दाखवा नोटीस पाठवून खातेनिहाय चौकशीची कारवाई करण्यात येत आहे.
Police officers were shocked by Ram Shinde’s carelessness in his visit.
महत्वाच्या बातम्या
- लग्नानंतर सात दिवसांनी हनिमूनसाठी गेलेल्या भारतीय नाैदलातील अधिकाऱ्याचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू
- मेळघाटातील कुपाेषणावर काय उपाययाेजना केल्या? काॅंग्रेसच्या नेत्या यशाेमती ठाकूर यांचा सवाल
- Ashish Shelar : उद्धव ठाकरे हे मुंबईतील भूखंड घोटाळ्याचे बादशहा, आशिष शेलार यांचा आरोप
- UPSC 2024 निकाल जाहीर, शक्ती दुबे देशात अव्वल, पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा ; महाराष्ट्राची कामगिरी उजळली