विशेष प्रतिनिधी
बीड: Suresh Dhas मी कुठेही घसरलेलो नाही. प्राजक्ता माळी यांनी माझे कालचे विधान पुन्हा एकदा ऐकावे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्ररणापासून लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न आहे. माझ्या ठायी विषय संपला आहे, मी माफी मागणार नाही, असे आमदार सुरेश धस यांनी स्पष्ट केले आहे. Suresh Dhas
बीड जिल्ह्यातील आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीचा उल्लेख केला होता. “सपना चौधरी, रश्मिका मंधाना, प्राजक्ता माळी असे इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना करायचे असेल, त्यांनी परळीला यावे. त्यांचं शिक्षण घ्यावं आणि संपूर्ण देशात त्याचा प्रसार करावा”, असं सुरेश धस म्हणाले होते. यावर त्यांना सुनावताना प्राजक्ता म्हणाली होती की बीडमध्ये पुरुष कलाकार गेले नाहीत का? तुम्हा महिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत नाहीत तर कर्तुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहात.
यातून तुमची मानसिकता दिसते. त्यांनी माझीच नाही तर इतर अभिनेत्रींचंही नाव घेतलं आहे त्यांचीही माफी मागावी, अशी मागणी प्राजक्ताने केली होती.यावर सुरेश धस म्हणाले, प्राजक्ता माळी यांनी त्यांचा गैरसमज दूर करावा. त्यांनी माझे विधान पुन्हा पहावे. त्यांनी माझा निषेध केला असेल तर मी त्यांचा निषेध म्हणून हास्य जत्रा कार्यक्रम बघायचं सोडेल. प्राजक्ता माळी यांचे कोणाशी तरी मैत्रीचे संबंध असतील. त्यातून त्यांनी हे केलं असावं, त्यांना विनंती विषय थांबवावा. मी एकदा त्यांना मुंबईत जाऊन भेटेल. त्यांना कोणीतरी प्रेस घ्यायला लावली असेल.
Prajakta Mali issue is over, I will not apologize, Suresh Dhas clarified
महत्वाच्या बातम्या
- Election Commission : काँग्रेसचा रडीचा डाव, निवडणूक आयोगाने केली बोलती बंद
- संतोष देशमुख हत्येमागील मास्टरमाईंडवर कारवाई व्हावी, बाळासाहेब थोरात यांची मागणी
- जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांसाठी 3 कोटींच्या वाहनांची खरेदी; माजी महापौरांनी थाटबाटावरून केली टीका
- विनोद कांबळी यांना ३० लाख रुपयांची मदत, प्रताप सरनाईक यांची माहिती