विशेष प्रतिनिधी
मुंबई: देशाच्या कायद्याच्या विरोधात भुमिका घेण्याऱ्यांचे लांगूलचालन करणे योग्य नाही. संभाजीराजे छत्रपती वातावरण चिघळवत आहेत. त्यांना सरळ उचलून मोक्का लावावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही हिंमत दाखवावी असे आवाहन त्यांनी केले.
संभाजीराजे छत्रपती यांनी रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी समोरील वाघ्या कुत्र्याचे शिल्प आहे. हे शिल्प हटवण्याची मागणी केली आहे. या मागणीच्याविरोधात धनगर समाजातील काही नेत्यांनी भूमिका घेतली आहे. त्यामुळे वाघ्या शिल्पाचा वाद चिघळणार का, याची चर्चा सुरू झाली आहे. या सगळ्या घडामोडींवर एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, धर्माचे राजकारण करताना जे सोईचे ते वापरतात. संभाजीराजे छत्रपती हे राजर्षी शाहूंचे पणतू आहेत म्हणून त्यांच्या विरोधात भूमिका घ्यायची नाही असे नाही. उद्या मी सुद्धा कायदा विरोधी कृत्य केले तर मला ही तुरुंगात टाकले पाहिजे.
ज्या भाजपचे हात मुसलमानांच्या रक्ताने माखले आहेत. त्यांच्याकडून सौगात ए मोदी स्विकारावा का हा विचार मौलवींनी करायला हवा, हेच मौलवी निवडणुकीच्या वेळी फतवे काढतात ना? मग तुमच्या 18 टक्के समाजाला नाकारणाऱ्यांकडून भेट स्विकारावा का? असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी केला.
Prakash Ambedkar demands that Sambhajiraje Chhatrapati be lifted straight and put on MoKKa
महत्वाच्या बातम्या
- Disha Salian सामुहिक बलात्कार झालेला नाही. डाेक्याला जखम झाल्यानेच मृत्यू , दिशा सालियनचा पाेस्टमार्टमचा रिपाेर्ट समाेर
- आजही माझ्या डोळ्यात पाणी आणि अंगावर काटे, आणिबाणीची आपबिती सांगत मुख्यमंत्र्यांचा काॅंग्रेसवर हल्ला
- Harshvardhan Sapkal : बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीच्या चौकशी अहवालाची लपवाछपवी का?: हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल
- Supreme Court : अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय असंवेदनशील ठरवत सर्वोच्च न्यायालयाची