विशेष प्रतिनिधी
जयसिंगपूर : राज्य सरकारने ऊस उत्पादक शेतक-यांना टप्या-टप्याने एफ. आर. पी. देण्याचा केलेला बेकायदेशीर कायदा रद्द करून एक रकमी एफ. आर. पी. देण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिल्यानंतर आज राज्य सरकारने एक रक्कमी एफ. आर. पी देण्याच्या कायद्याला मान्यता दिली.
मात्र साखर सम्राटांच्या इशा-यावर बटीक झालेले राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत असल्याचे या निर्णयावरून स्पष्ट झाले असले तरी सर्वोच्च न्यायालयात सुध्दा सरकारला चितपट करू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिला.
यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले कि , आज राज्य सरकारच्या सहकार विभागाने एकरकमी एफ. आर. पी चा कायदा पुर्ववत करण्याचा शासन निर्णय केला असून यामध्ये राज्य सरकारने स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयातील अपिलातील अंतिम निर्णयास अधिन राहून हा निर्णय करत असल्याचे स्पष्ट केले आहे.
राज्य सरकार साखर सम्राटांच्या इशा-यावर शेतकरी हिता विरोधात निर्णय घेत आहे हे मला माहित असल्याने मी याआधीच सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. ज्यावेळेस उच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली तेंव्हा राज्य सरकारने राज्यातील नामांकित वकीलांची फौज उभी केली होती. राज्याचे महाभियोक्ता बिरेंद्र सराफ यांना सुनावणी दरम्यान शेतक-यांच्या हिताच्या निर्णयाविरोधात भुमिका घेण्यास सांगितले.
गत हंगामातील तुटलेल्या उसाची जवळपास ७ हजार कोटी रूपयापेक्षाही जास्त एफ. आर. पी थकीत आहे. राज्य सरकार जनतेच्या करातून सर्वोच्च न्यायालयात वकीलांची फौज उभी करून पैशाचा चुराडा करत आहे.राज्य सरकार साखर कारखानदारांचे बटीक झाले नसेल तर यामधून त्यांनी बाजूला व्हावे साखर कारखानदार व आम्ही सर्वोच्च न्यायालयात समोरासमोर लढू अन्यथा राज्य सरकार व साखर सम्राटांना शेतक-यांच्या लोकवर्गणीतून सर्वोच्च न्यायलयातही चितपट करणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
Raju Shetty warns that we will challenge the government over the FRP decision
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis शेतकऱ्यांना पुढील वर्षीपर्यंत १२ तास मोफत वीज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
- Sanjana Ghadi : शिवसेना ठाकरे गट ठराविक गटाच्या ताब्यात; संजना घाडींचा उध्दव ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’ करताना टोला
- लाडक्या बहिणींमुळे निवडून आलो, गुलाबराव पाटील म्हणाले मला गॅरंटी नव्हती
- चंद्रकांत खैरे ढोंगी माणूस, आता त्यांनी नातवंडं सांभाळावीत, संदीपान भुमरे यांची टीका