विशेष प्रतिनिधी
ठाणे : माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील Satej Patil यांच्या पुतण्याच्या विरोधात ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झााला आहे. पृथ्वीराज पाटील, असे गुन्हा दाखल झालेल्या सतेज पाटील यांच्या पुतण्याचे नाव आहे. पृथ्वीराज पाटील हा डॉ. डी. वाय. पाटील यांचा नातू आहे.
कापूरबावडी भागातील महाविद्यालयीन विद्यार्थिनीला लग्नाच्या आमिषाने लैंगिक अत्याचार करून तिला गर्भपात करण्यासही भाग पाडल्याचा आरोप पृथ्वीराज पाटीलवर आहे.
उच्चभ्रू संकुलात राहणाऱ्या 29 वर्षीय वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार झाला. ठाणे, नवी मुंबई आणि प्रामुख्याने पाटील यांच्या कोल्हापुरातील बंगल्यावर हे प्रकार घडले. अनेकवेळा तिच्यावर हल्लाही करण्यात आला.
धमकावून तिला कोल्हापुरात गर्भपात करण्यास भाग पाडल्याचाही आरोप पीडितेने कापूरबावाडी पोलिस ठाण्यात 7 मार्चला दाखल केलेल्या तक्रारीत केला आहे. पीडित तरुणीने पोलिसांना गर्भपात केल्याचा रुग्णालयाचा अहवाल आणि तिच्यासोबत केलेल्या चॅटिंगचा पुरावाही दिला.
Rape case filed against former Minister of State for Home Satej Patil’s nephew, young doctor files sexual assault complaint
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray तुमच्या बापाने मुंबई दिली नाही, ती मराठी माणसाने लढून मिळवली, उद्धव ठाकरे यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका
- Uday Samant आता मंत्री उदय सामंत अडचणीत, वडिलांच्या कंपनीने महामार्गाच्या कामात गैरव्यवहार केल्याचा आरोप
- खोटे आरोप करण्याची हिम्मत… धनंजय मुंडे यांचा सुरेश धस यांना इशारा
- क्रूर, लुटारू औरंगजेबाचे खानदानच लुटेरे, बाबा रामदेव म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजच आमचे आदर्श