Beed : गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर बीडला दिलासा; टाटा टेक्नॉलॉजीकडून १९१ कोटींचं प्रशिक्षण केंद्र, ७ हजार तरुणांना रोजगाराच्या संधी

Beed : गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर बीडला दिलासा; टाटा टेक्नॉलॉजीकडून १९१ कोटींचं प्रशिक्षण केंद्र, ७ हजार तरुणांना रोजगाराच्या संधी

Beed

विशेष प्रतिनिधी 

बीड : Beed  गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी, हत्या, अत्याचार आणि आत्महत्यांच्या घटनांमुळे चर्चेत असलेल्या बीड जिल्ह्याला आता एक सकारात्मक दिशा मिळण्याची शक्यता आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडच्या तरुणांसाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या मोठ्या संधी जाहीर केल्या आहेत.Beed

अजित पवार यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून “बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी..!” अशी पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. बीडमध्ये टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या पुढाकाराने तब्बल १९१ कोटी रुपये खर्च करून ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन, इक्युबेशन अँड ट्रेनिंग’ (CIIIT) या नावाने एक अद्ययावत प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे.

या केंद्राच्या माध्यमातून दरवर्षी ७ हजार युवकांना जागतिक दर्जाचं औद्योगिक व तांत्रिक प्रशिक्षण दिलं जाणार आहे. यामुळे बीडमधील युवकांना आधुनिक कौशल्ये आत्मसात करता येणार असून, उद्योग-व्यवसायासाठी एक अनुकूल वातावरण निर्माण होईल.

“पालकमंत्री म्हणून सांगताना मला अत्यंत समाधान वाटतंय की टाटा टेक्नॉलॉजीने बीड जिल्ह्यासाठी हे महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. या उपक्रमामुळे युवकांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या दिशा खुल्या होतील,” असे अजित पवार यांनी नमूद केले.

सध्या नकारात्मक कारणांनी चर्चेत असलेल्या बीडसाठी ही योजना नव्या आशेचा किरण ठरू शकते, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Relief for Beed in the wake of crime; Tata Technology sets up Rs 191 crore training center, employment opportunities for 7,000 youth

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023