विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला आहे. कोणी मतदारांना वेश्या म्हणत असेल तर एकनाथ शिंदें त्यांचा राजीनामा घ्या अशी मागणी त्यांनी केली आहे.
विधानसभा निवडणुकीत मतदार दोन-दोन हजारात विकले गेले तुमच्यापेक्षा तर रांxx बऱ्या” असे वादग्रस्त वक्तव्य संजय गायकवाड यांनी केले आहे. अजित पवार यांनीही मते दिली म्हणजे तुम्ही मला विकत घेतले का असा सवाल केला यावरुन राऊत यांनी संजय गायकवाड आणि अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
राऊत म्हणाले, मतदारांना जर कोणी वेश्या म्हणत असेल, लोकशाहील कोणी रखेल म्हणत असेल, संविधानाला कोणी गुलाम मानत असेल, सत्ताधारी पक्षाचे आमदारचं अशी वक्तव्य करत असतील तर ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी आहे. 2-2 हजारांना मतदार विकत घेतले , मतदारांना उद्देशून असं अश्लील बोलणं, वेश्या म्हणणं यावर विधानसभेचे अध्यक्ष, राज्यपाल यांनी मत व्यक्त केलं पाहिजे. शिंदे गटाच्या आमदारांचे वक्तव्य आम्ही गंभीर मानतो.या महाराष्ट्रातील कोट्यावधी मतदारांना जर कोणी वेश्या म्हणत असेल तर एकनाथ शिंदे यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे.मतदार तुम्हाला वेश्या वाटतात ? मतदान तुम्ही पैसे देऊन घेतलं असेल तर तुम्हाला त्याच फ्रस्टेशन आलं असेल .
लाडकी बहीण योजनेचा सरकारी तिजोरीवर कसं ओझं होतंय, कसा भार आहे, हे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे नुकतेच बोलले . म्हणजे 1500 रुपये देऊन तु्म्ही मतं विकत घेतली, पण आता तुम्हाला सरकारी योजनेवर भार टाकणं जमत नाहीये, राज्य चालवता येत नाही, हे स्पष्ट दिसतंय.
शिर्डीतील साई संस्थान मोफत जेवण बंद करावे. कारण त्यामुळे शिर्डीत भिकारी वाढलेत असे वादग्रस्त वक्तव्य माजी खासदार सुजय विखे यांनी केले आहे.यावर त्यांना सुनावताना राऊत म्हणाले, भाजपकडे गेलेले सगळे भिकारी आहेत. हे द्या ते द्या, भ्रष्टाचारावरील कारवाईपासून वाचवा म्हणते हे सगळे भिकारीच आहेत. त्यांच काय ते बघा. मग शिर्डीतील भिकराऱ्यांबद्दल बोला. भ्रष्टाचार लपवण्यासाठी आणि सत्तेसाठी भाजपच्या दरवाजात हेच भीक मागत आहेत.
Resign the MLA who calls voters whores, Sanjay Raut’s attack
महत्वाच्या बातम्या
- या खासदाराची चड्डी सुद्धा जागेवर राहणार नाही, सहाय्यक पोलिस निरीक्षकाचा बजरंग सोनवणे यांना इशारा!
- भिकारी वाढलेत, शिर्डीतील साईबाबा संस्थानचे मोफत जेवणावर सुजय विखेंची टीका
- Devendra Fadnavis : भाजप, कम्युनिस्ट सोडता सर्व 2300 पक्ष खाजगी मालकीचे, देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
- अडीच वर्ष शिव्या-शाप देणाऱ्यांचे तोंड महाराष्ट्रातील जनतेने बंद केले, एकनाथ शिंदे यांचा टोला