पेट्राेल आणि डिझेल भाववाढीमुळे इलेक्ट्रिक वाहनांना माेठी पसंती, बाजारातील वाटा ११ टक्क्यांच्या पुढे

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पेट्राेल आणि डिझेलचे भाव वाढत असल्याने इलेक्ट्रिक वाहनांना माेठी पसंती मिळत असून विक्रीमध्ये माेठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. इलेक्ट्रिक वाहनांचा (EV) बाजारातील वाटा प्रथमच ११ टक्क्यांच्या पुढे गेला आहे.

इंधन दरवाढ, पर्यावरणपूरक वाहनांबाबत वाढती जागरूकता आणि ग्रामीण भागातील मागणी यामुळे भारतातील वाहन विक्रीने मे २०२६ मध्ये नवा उच्चांक गाठला आहे. मे महिन्यात देशात एकूण २५.३१ लाख वाहनांची किरकोळ विक्री झाली, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत ९.५५ टक्क्यांनी अधिक आहे, अशी आकडेवारी वाहन विक्रेता संघटना फेडरेशन ऑफ ॲटोमोबाईल डीलर्स असोसिएशन पश्चिम आशियातील तणावामुळे मे महिन्यात इंधनाच्या किमती वाढल्यानंतर ग्राहकांचा कल इंधन-बचत करणाऱ्या आणि पर्यायी ऊर्जेवर चालणाऱ्या वाहनांकडे वळल्याचे ‘फाडा’ने नमूद केले आहे.



दुचाकी क्षेत्रात इलेक्ट्रिक वाहनांचा वाटा एका वर्षात ६.११ टक्क्यांवरून ९.२५ टक्क्यांपर्यंत वाढला. इंधन खर्च कमी करण्यासाठी ग्राहकांकडून ईव्हींबाबत चौकशी वाढल्याचे वाहन विक्रेत्यांनी सांगितले.
मे २०२६ मध्ये प्रवासी वाहनांची विक्री ४,०२,५९१ युनिट्सवर पोहोचली. गेल्या वर्षी याच महिन्यात ती ३,२६,६५६ युनिट्स होती. मे महिन्यात १८.४४ लाख दुचाकी विकल्या गेल्या, तर एक वर्षापूर्वी हा आकडा १७.१५ लाख होता.
मान्सूनची प्रगती, खरीप हंगामाची तयारी आणि लग्नसराईचा उर्वरित काळ यामुळे मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. विशेषतः ईव्ही आणि नव्या मॉडेल्समुळे प्रवासी वाहन क्षेत्राला बळ मिळू शकते. फाडाच्या मते, पुढील तीन महिने वाहन उद्योगासाठी सकारात्मक राहण्याची शक्यता आहे.

Rising petrol and diesel prices boost EV demand, market share crosses 11%

महत्वाच्या बातम्या