विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील तिसरी आघाडी असलेल्या परिवर्तन महाशक्तीचे दीडशे उमेदवार निश्चित झाले आहेत. आघाडीचे एक नेते संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यात परिवर्तन घडविण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना सोबत येण्याचे आवाहन केले आहे.
परिवर्तन महाशक्तीच्या कोअर कमिटीची आज बैठक झाली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीचा आढावा घेऊन कुठला पक्ष किती जागा लढवणार यावर सविस्तर चर्चा झाली. या बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू आणि संभाजी राजे छत्रपती उपस्थित होते.
परिवर्तन महाशक्तीच्या आज झालेल्या पत्रकार परिषद बोलताना संभाजी राजे म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांच्याशी माझी सविस्तर चर्चा झाली आहे. ते मराठा समाजाचे नेतृत्व करतात, त्यांनी लवकर निर्णय घ्यावा. आमच्या मध्ये आले तर आनंदच आहे. जरांगे पाटील हे आमच्यामध्ये नाही आले तरी त्यांनी निवडणूक लढवावी हा सकारात्मक दृष्टीकोन असेल 20 तारीखला ते बैठक घेणार आहेत . सर्वांना एका छताखाली यावे ही भूमिका आहे.
काँग्रेसवर फसवणुकीचा आरोप करताना संभाजी राजे म्हणाले, स्वराज्य ही चळवळ छत्रपती शाहू महाराज खासदार व्हायच्या आधीपासून सुरू आहे लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेस आणि स्वराज्य आघाडी करणार होते. कोल्हापूरची जागा स्वराज्याला देणार असा शब्द मला काँग्रेसच्या हाय कमांडने शब्द दिला होता. छत्रपती शाहू महाराजांची उमेदवारी पुढे आल्यानंतर माझ्या समोरचे सगळे पर्याय थांबले शाहू महाराज उभे राहिले असताना एक मुलगा म्हणून माझी जी जबाबदारी होती ती मी पूर्णपणे पार पाडली. शाहू महाराज निवडून आले तेव्हा कॉंग्रेसने सत्कार सोहळ्यात मला का बोलावले नाही? शाहू महाराज यांना निवडूण आणण्यात मी पण राबलो होतो
यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, मविआ आणि महायुती सारखे आम्ही चर्चेचे गुऱ्हाळ लावलेले नाही. पहिल्याच बैठकीत आमचे दीडशे मतदारसंघावर एकमत झाले आहे, उरलेल्या जागा पुढील बैठकीत फायनल करु . एका मतदारसंघात दोन-तीन पक्षांनी दावा सांगितल्यामुळे जागा राहिल्या आहेत. पण त्यावर समन्वयाने मार्ग काढू सर्वसामान्य लोकं परिवर्तन महाशक्तीच्या मागे उभे राहिलेले दिसत आहेत. प्रत्येक मतदारसंघात विश्वासू चेहरा देणार. मविआ आणि महायुती हे वेगवेगळ्या रंगाचे पॅकेजेस आहेत मात्र आतील माल एकच आहे. खऱ्या अर्थाने अस्सल विचार घेऊन आम्ही पुढे जाणार आहेसमाजातील प्रत्येक घटक, वंचिताला न्याय देणारी आमची परिवर्तन महाशक्ती आहे . दीडशे जागांवरील उमेदवार ते ते पक्ष ठरवतील
बच्चू कडू म्हणाले, शेतकरी, शेतमजूरांचे राज्य यावे ही भूमिका घेऊन आम्ही पुढे जात आहोत. बजेटचे डिझाईन बदलायचे आहे . भाजप आणि कॉंग्रेस हे धार्मिक लढाई उभे करणारे पक्ष आहेत. एका झेंडाच्या रंगाचे नाही तर तिरंगाचे सरकार आम्ही आणू . शरद पवार म्हणतात आम्ही परिवर्तन आणू, ते कसले परिवर्तन आणतात ते सत्तेत असताना आणू शकले नाहीत, परिवर्तन आम्ही आणणार.बजेटमधील हिस्सा सामान्य माणसाच्या वाट्याला नेण्याचे परिवर्तन असेल. नुकसान नेत्यांचे होईल आणि फायदा जनतेचा होईल .
Sambhaji Raje Chhatrapati appeal Manoj Patil to join Parivartan mahashakti
महत्वाच्या बातम्या
- Narendra Modi : मोदी बनले भाजपचे पहिले सक्रिय सदस्य; पंतप्रधानांनी सदस्यत्व मोहिमेला केली सुरुवात
- NCP SP : पवारांच्या राष्ट्रवादीत आलेत नेते 10, 7 वाटेवर; पण “चाणक्य खेळी”च्या बातम्या शेकड्यांवर!!
- CJI Chandrachud : संविधान बदलाच्या नॅरेटिव्हला सरन्यायाधीशांची थप्पड; ब्रिटिशकालीन न्याय देवतेचे भारतीयीकरण!!
- Supreme Court : फ्रीबीजवरून सुप्रीम कोर्टाची केंद्रासह निवडणूक आयोगाला नोटीस; याचिकाकर्त्यांची बंदीची मागणी