वक्फच्या मालमत्तांवर लाडक्या उद्योगपतींचा डोळा , संजय राऊत यांचा आरोप
New Delhi News: वक्फ दुरुस्ती विधेयकाचा हिंदुत्वाशी संबंध नाही. देशात अशा आठ लाख मालमत्ता असून त्यांची किंमत २.५ लाख कोटी रुपये इतकी आहे. या मालमत्तांवर सरकारमधील काही लोक, सरकारच्या जवळ असलेल्या किंवा लाडक्या उद्योगपतींचा डोळा असावा. त्यासाठी हा कार्यक्रम आज सुरू होईल.
संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, सरकार या वक्फ दुरुस्ती बिलात काही सुधारणा करत आहे. .पण त्यांचा हेतू स्वच्छ नाही.हे बिल अधिक पारदर्शक असायला हवे होते. ती पारदर्शकता या क्षणी तरी दिसत नाही. इतक्या घाईने बिल आणण्यापेक्षा आणखी काही काळ जाऊन विरोधी पक्षांना हव्या असलेल्या अनेक सुधारणा त्यात आणून काम करता आलं असतं. मात्र, केंद्र सरकारने तसा विचार केला नाही. हीच गोष्ट हिंदुत्वाच्या नावाखाली खपवली जात आहे. मात्र, या विधेयकाचा हिंदुत्वाशी काहीच संबंध नाही. उगाच महाराष्ट्र व देशाचं वातावरण बिघडवू नका. वक्फ दुरुस्ती विधेयकाचा हिंदुत्वाशी संबंध नाही. फडणवीस तसा दावा करत असतील, तर त्यांनी आमची शाळा घ्यावी, आम्ही येऊ. ते जर नवे शंकराचार्य झाले असतील तर त्यांनी आमची शाळा किंवा शिबिरं घ्यावी.
Chief Minister : वैदिक गणितावर आधारित गुणवत्ता केंद्र सुरू करणार , मुख्यमंत्र्यांची माहिती
शिवसेना प्रखर हिंदुत्ववादी आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी सातत्याने हिंदुत्व आणि विज्ञानवाद यांना सपोर्ट केला. फडणवीस किंवा त्यांचे बगल बच्चे हे वक्फ बिलाच्या निमित्ताने बांग देतात हा मूर्खपणा आहे” अशी टीका संजय राऊत यांनी केली.
वक्फ दुरुस्ती विधेयक आज (२ एप्रिल) संसदेत मांडलं जाणार आहे. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला आहे. फडणवीस म्हणाले, “वक्फ सुधारणा विधेयक उद्या संसदेत! बघू या उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना, हिंदूहृदयसम्राट, वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार की राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करीत राहणार?” यावर आता शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Sanjay Raut alleges that favoured industrialists are eyeing Waqf properties
महत्वाच्या बातम्या
- Chief Minister : वैदिक गणितावर आधारित गुणवत्ता केंद्र सुरू करणार , मुख्यमंत्र्यांची माहिती
- Maharashtra भाऊसाहेबांकडचे हेलपाटे वाचले, महाराष्ट्रातील शेतकरी हायटेक झाले, शासनाला ७६ कोटी ८० लाख
- Ashish Shelar लागली बत्ती पार्श्वभागाला की.. आशिष शेलार यांच्यावर टीकेवरून संदीप देशपांडे यांना इशारा
- Kunal Kamra मुंबईत येईल तेव्हा शिवसेना स्टाईलने स्वागत करू…राहुल कनाल यांचा कुणाल कामराला इशारा