विशेष प्रतिनिधी
मुंबई : जसा नेता त्यांची तशी खालची टपोरी चिल्लर पोरेबाळे आहेत. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीचा विनयभंग करणारे तीच प्रवृत्ती, तोच पक्ष आणि त्याच पक्षातील हेच महान सामाजिक कार्यकर्ते आहेत. अन् म्हणे हे महाराष्ट्र घडवणार आहेत, असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांचा बंदोबस्त केला पाहिजे, अशी मागणीही राऊत यांनी केली.
केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची यात्रेत छेड काढण्यात आली होती. स्वतः रक्षा खडसे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावर राऊत म्हणाले, केंद्रीय मंत्र्यांची मुलगी सुरक्षित नसेल, तर राज्यातील सामान्य लेकीबाळींची काय परिस्थिती असेल? फक्त लाडकी बहीण-लाडका भाऊ खुळखुळे वाजवून फार काळ राहता येणार नाही. रोज लाडक्या बहिणींचा विनयभंग होत आहे. महादेव मुंडे यांची पत्नी परत उपोषणाला बसत आहे. त्यांची मुलगी लाडकी बहीण नाही का?”
देवेंद्र फडणवीसांना राजकारणातून पोलीस खाते, कायदा-सुव्यवस्था आणि जनतेचे प्रश्न पाहायला वेळ मिळत नाही. जळगावात विनयभंग करणारे सामाजिक कार्यकर्ते आहेत. वाल्मिक कराड, कृष्णा आंधळे, धनंजय मुंडे हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. मोठे सामाजिक काम त्यांनी महाराष्ट्रात उभे केले आहे, असा टोलाही त्यांनी मारला.
राऊत म्हणाले, जिकडे सत्ता तिकडे बलात्कारी, खून आणि व्यभिचारी आहेत. ठाण्यात आम्ही गेल्यावर आमच्या गाड्या अडवण्याचा प्रयत्न गुंडांनी केला. आनंद दिघे यांच्या आश्रमासमोर आमच्या गाड्या अडवल्या. हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. आनंद दिघे यांना पुष्पहार अर्पण केल्यावर तो हार आणि शाल रस्त्यावर फेकून देत अपमान केला. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीचा विनयभंग करणारे तीच प्रवृत्ती, तोच पक्ष आणि त्याच पक्षातील हेच महान सामाजिक कार्यकर्ते आहेत. हे महाराष्ट्र घडवणार आहेत. जसा नेता त्यांची तशी खालची टपोरी चिल्लर पोरेबाळे आहेत. यांचा फडणवीस यांनी बंदोबस्त केला पाहिजे.
Sanjay Raut attack on Eknath Shinde
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis गतिमान आणि प्रगतीशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार! अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची बैठक
- Russia : ”रशियाने युक्रेनमधील चेर्नोबिल पॉवर प्लांटवर हल्ला केला”
- PM Modi : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंध अधिक मजबूत
- Manipur : मणिपूरमधील कॅम्पमध्ये सीआरपीएफ जवानाने केला गोळीबार अन् नंतर…