विशेष प्रतिनिधी
मुंबई : पीओपीच्या मुर्तींवरती बंदी आणलेली आहे, हे कसलं हिंदुत्व ?” वर्षातून एकदा येणाऱ्या सणावर तुम्ही बंधन आणताय. आमच्या राज्यात हिंदुंचे सण खुल्या वातावरणात होतील सांगता होता, मग आता काय झालं? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
राज्यात सध्या पीओपी मूर्तींवर बंदी असल्याने गणेश मूर्तिकार नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर राऊत यांनी महा कुंभ पवित्र स्नानावरही आक्षेप नोंदविला. ते म्हणाले, पर्यावरणाची इतकी काळजी आहे, मग गढूळ पाण्यात महाकुभंमध्ये का स्नान करायला लावलं?. राष्ट्रीय हरीत लवादाचा रिपोर्ट असताना सुद्धा त्या गटारगंगेत कोट्यवधी लोकांना का डुबकी मारायला लावली?
राऊत यांनी यावेळी राज्य सरकारच्या आर्थिक स्थितीवरही टीका केली. हे राज्य कसं चालवणार हा प्रश्न आहे. कर्ज काढून दिवाळी साजरी करणं किंवा निवडणुकीत मत विकत घेणं हा म्हणजे कर्जबाजारी महाराष्ट्राची तिजोरी या लोकांनी महिलांची मत विकत घेण्यासाठी वापरली. 9 लाख 32 हजार कोटींच महाराष्ट्रावर कर्ज आहे.
आता कर्ज काढून राज्य चालवल जातय. राज्य़ लुटल जातय. राज्यावरच कर्जाच ओझ दिवसेंदिवस वाढतय हे माहित असताना सुद्धा लाडक्या बहिणी सारख्या योजना आणल्या आणि आता त्या बंद करायच्या मार्गावर आहेत. शिवभोजन थाळी सारख्या गरीबांच्या योजना, शिधा योजना अशा अनेक योजना बंद केल्या. आता लाडकी बहिण योजना सुद्धा बंद करतील” असा दावा खासदार राऊत यांनी केला.
Sanjay Raut questions the Mahayuti government
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray तुमच्या बापाने मुंबई दिली नाही, ती मराठी माणसाने लढून मिळवली, उद्धव ठाकरे यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका
- Uday Samant आता मंत्री उदय सामंत अडचणीत, वडिलांच्या कंपनीने महामार्गाच्या कामात गैरव्यवहार केल्याचा आरोप
- खोटे आरोप करण्याची हिम्मत… धनंजय मुंडे यांचा सुरेश धस यांना इशारा
- क्रूर, लुटारू औरंगजेबाचे खानदानच लुटेरे, बाबा रामदेव म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजच आमचे आदर्श