विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sanjay Raut’ संजय राऊतांच्या ‘एकला चलो’ भूमिकेवर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. राऊत यांच्या देहबोलीतून नैराश्य दिसत आहे. जय-पराजय होत असतो, खचून जाण्याची गरज नाही,” असे म्हणत वडेट्टीवारांनी राऊत यांचा स्वतंत्र पक्ष आणि विचारधारा असल्याचे मान्य केले. आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढण्यासाठी तयार आहोत, परंतु संजय राऊत यांच्या भूमिकेसंदर्भात स्पष्टता आल्यावर निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले.Sanjay Raut’
वडेट्टीवार म्हणाले की, “फोडाफोडीचे राजकारण भाजप करत असते. शरद पवार पुरोगामी विचारांच्या माणसांपैकी आहेत, त्यामुळे ते वेगळ्या दिशेने जाण्याचा विचार करणार नाहीत,” असे ते म्हणाले. अमित शहा आणि पवार यांच्या भेटीबाबत त्यांनी फारसे महत्त्व देऊ नये, अशी सूचनाही केली.
चार दिवसांचे अधिवेशन लोकांच्या फक्त वेळेचा अपव्यय असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली. “किमान दोन आठवड्यांचे अधिवेशन होणे गरजेचे होते. विदर्भाच्या प्रश्नांवर चर्चा होणारच नाही. हे अधिवेशन मुंबईत घेणे योग्य झाले असते,” असे त्यांनी नमूद केले.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या यश-अपयशाच्या जबाबदारीबाबत वडेट्टीवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “जय-पराजयाची जबाबदारी संबंधित नेतृत्वावर असेल. दिल्लीत होणाऱ्या चर्चेनंतर पुढील दिशा ठरेल,” असे ते म्हणाले.
रमेश चेन्नीथला यांच्या चर्चांबाबत ते म्हणाले की, “राज्यात पक्ष मजबूत करण्यासाठी 16 आमदारांच्या भरोशावर उभा राहणे ही एक कसोटी आहे. नेतृत्व कोणाकडे द्यायचे हे ठरवणे गरजेचे आहे.”