विशेष प्रतिनिधी
मुंबई : Ladki Bahin scheme दिशा सालियन प्रकरणात सतीश सालियन यांनी एक लाख कोटींच्या मानहानीचा दावा तयार केला आहे. या दाव्यातून मिळणारी 90 टक्के रक्कम मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेस अनुदान म्हणून सतीश सालियन देणार आहेत. तर, मानधनातील उर्वरित 9 टक्के रक्कम इमानदार असलेल्या पत्रकारांसाठी खर्च करण्यात येणार आहे. फक्त 1 टक्के रक्कम सतीश सालियन स्वत:कडे ठेवणार आहेत,” अशी माहिती निलेश ओझा यांनी दिली.Ladki Bahin scheme
दिशा सालियन मृत्यू प्रकरणी वडील सतीश सालियन यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार आदित्य ठाकरे, अभिनेता सूरज पांचोली आणि अभिनेता डिनो मोरिया यांच्यावर सतीश सालियन यांनी गंभीर आरोप केले आहेत. याप्रकरणी उच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी पार पडणार आहे. त्यापूर्वी सतीश सालियन यांचे वकील निलेश ओझा यांनी पत्रकार परिषदेत न्यायमूर्तींच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठासमोर दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची सुनावणी होणार आहे. पण, न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांची बहीण महाविकास आघाडीत सक्रिय राजकारण करत आहेत. त्यामुळे न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठाकडून दुसरीकडे हे प्रकरण वर्ग होऊ शकते, असे निलेश ओझा यांनी म्हटले आहे.
ओझा म्हणाले, “दिशा सालियन प्रकरणी बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता कमी आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी आहे. पण, त्यांच्याविरोधात आमची तक्रार आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांची सख्खी बहीण वंदना चव्हाण आहेत. त्या सक्रिय राजकारणी असून महाविकास आघाडीच्या घटक पक्षात आहे. त्यामुळे हे प्रकरण न्यायालयाकडूनच दुसऱ्या खंडपीठासमोर घेऊन जा, असे सांगितले जाऊ शकते.”
Satish Salian’s defamation claim of one lakh crores, one per cent to journalists and also provision for Ladki Bahin scheme
महत्वाच्या बातम्या
- Chief Minister : वैदिक गणितावर आधारित गुणवत्ता केंद्र सुरू करणार , मुख्यमंत्र्यांची माहिती
- Maharashtra भाऊसाहेबांकडचे हेलपाटे वाचले, महाराष्ट्रातील शेतकरी हायटेक झाले, शासनाला ७६ कोटी ८० लाख
- Ashish Shelar लागली बत्ती पार्श्वभागाला की.. आशिष शेलार यांच्यावर टीकेवरून संदीप देशपांडे यांना इशारा
- Kunal Kamra मुंबईत येईल तेव्हा शिवसेना स्टाईलने स्वागत करू…राहुल कनाल यांचा कुणाल कामराला इशा