विशेष प्रतिनिधी
बीड : तपास यंत्रणा आम्हाला तपासाबाबत कोणतीही माहिती देत नसून काही आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत का? असा सवाल करत आहे.
संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आंदोलन सुरू केले आहे.एसआयटीचे वरिष्ठ अधिकारी उद्या त्यांची भेट घेतील, असे आश्वासन बीडचे पोलीस अधिक्षक नवनीत कावत यांनी दिले.
बीड जिल्ह्यातील गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. त्यानंतर संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेतील आरोपींना अटक करण्यात आली, तर एक आरोपी अद्यापही फरार आहे. तसेच वाल्मिक कराड खंडणीच्या गुन्ह्यात पोलिसांना शरण आला असून तोही पोलीस कोठडीत आहे.
मात्र वाल्मिक कराडचाही या हत्येच्या घटनेत सहभाग असूनही त्याला मोका लावलेला नाही. याविरोधात देशमुख कुटुंबाने आंदोलन सुरू केले आहे.या पार्श्वभूमीवर बीडचे पोलीस अधिक्षक नवनीत कावत यांनी मस्साजोग येथे भेट दिली. देशमुख यांना एसआयटी माहिती देत नाही यासंदर्भातील मागणी आम्ही एसआयटीपर्यंत पोहचवली आहे. एसआयटीचे वरिष्ठ अधिकारी उदय देशमुख कुटुंबाची भेट घेणार आहेत असे नवनीत कावत यांनी सांगितले. ते म्हणाले, गावकरी आणि देशमुख कुटुंबाला विनंती आहे अशा पद्धतीने आंदोलन करू नका न्यायासाठी सर्व तपासणी यंत्रणा प्रयत्न करत आहेत.
Senior SIT officials to meet Deshmukh family; According to Superintendent of Police Navneet Kawat
महत्वाच्या बातम्या
- ठाकरे गटाचे स्वबळावरच निवडणुका लढविण्याचे संकेत, महाविकास आघाडीत फूट स्पष्ट
- Sanjay Raut स्वबळावर लढू, काय होईल ते होईल, संजय राऊत यांची आरोळी
- वाल्मिक कराड वगळता संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का
- Sanjay Raut काही लोक मुख्यमंत्रीपदाचा कोट शिवून बसले होते, संजय राऊत यांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल