विशेष प्रतिनिधी
नागपूर : शरद पवारांना साखर कारखानदार अडचणीत आले याची जाणीव झाली परंतु राज्यातील शेतकरी सुद्धा अडचणीत आहेत. ऊसाला जास्त भाव मिळावा यासाठी शरद पवारांनी पत्र लिहायला हवे होते असा सल्ला आमदार सदाभाऊ खोत यांचा यांनी दिला आहे.
खोत म्हणाले, अनेक साखर कारखाने २०००-३२०० रुपया पर्यंत ऊसाला भाव देत आहेत. याबाबत शरद पवारांनी पत्र लिहायला हवं होते.बारामतीला मात्र सोमेश्वर साखर कारखाना ३६०० रुपये ऊसाला भाव देत आहे. शरद पवार यांना शेतकऱ्यांचा कळवळा का येत नाही असा सवालही त्यांनी केला.
आपण अनेक योजना एसटीच्या माध्यमातून दिल्या आहेत, या सगळ्याचा विचार केला असता दरवाढीचा निर्णय योग्य वाटतो, असेही खोत म्हणाले.