विशेष प्रतिनिधी
बीड : Sharad Pawar MLA बीड जिल्ह्यातील आणखी एका आमदाराच्या गुंडगिरीचा प्रकार समाेर आला आहे. शरद पवारांच्या पक्षाचे आमदार आमदार संदीप क्षीरसागर यांनी च सरकारी अधिकाऱ्याला फोन करुन शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. त्यांच्यावर वार करण्याची धमकीही दिली.Sharad Pawar MLA
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी बीड नगरपरिषदेतील लेखापाल गणेश पगारे यांना फोन करुन शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिली आहे. गणेश पगारे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत आणि मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही आमदार क्षीरसागर यांच्याविरोधात लेखी तक्रार दिली आहे.
बीड नगर परिषदेतील लेखापाल गणेश पगारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आमदार संदीप क्षीरसागर यांनी फोन करुन शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यांचे स्वीय सहायक चौरे हे गणेश पगारे यांच्या घरी आले आणि त्यांनी साहेबांना तुमच्याशी बोलायचे आहे असे सांगत आमदार क्षीरसागर यांना फोन केला. तेव्हा मी म्हणालो मी माझ्या फोनवरुन बोलतो तर ते म्हणाले, नाही माझ्या फोनवरच बोला. तर मी चौरे कडून फोन घेतला तर तिकडून आमदार क्षीरसागर मला म्हणाले की, कारे नुसता गोड गोड बोलतो. असे म्हणत त्यांनी शिवीगाळ केली. तसेच, आता मी बीडला आल्यावर लवकर माझ्याकडे यायचं, असे म्हणत शिवीगाळ केली. मी त्यांना सारखं भैय्या काय झाले, मला सांगा. तर ते फक्त शिव्या व वार करण्याची भाषा करत होते. असे पगारे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
आमदार क्षीरसागर यांच्या फोनबद्दल मी घरी सांगितले तर कुटुंबिय भयभीत झाले. आमच्या घरी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरा करण्याचे दिवस असून आम्ही त्या आनंदात आहोत. परंतु, बीडचे आमदार संदीप रविंद्र क्षीरसागर यांनी मला शिव्या दिल्यामुळे आम्ही भयभीत झालेलो आहोत.
Sharad Pawar’s MLA’s hooliganism, abusing a government official and threatening to kill him
महत्वाच्या बातम्या