विशेष प्रतिनिधी
मुंबई : Aditya Thackeray दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेंजर दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची मागणी तिच्या वडिलांनी केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. विधानसभेत मंत्री नितेश राणे यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अटकेची मागणी केली आहे. मात्र शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी या प्रकरणातील आरोपामध्ये काही तथ्य नसल्याचे म्हटले आहे.Aditya Thackeray
दिशाचे वडिल सतीश सालियान यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मृत्यू प्रकरणाची पुन्हा एकदा सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी या याचिकेत केली आहे.
माध्यमांसोबत बोलताना आमदार संजय गायकवाड म्हणाले, दिशा सालियान प्रकरणात सीआयडीच्या तपासात राजकीय नेत्यांचा सहभाग नव्हता. मी आदित्य ठाकरेंची पाठराखण करत नाही, जे तपासात समोर आलंय ते सांगतोय. कोणाकडे काही पुरावे असतील तर द्यायला हवे होते. कोणाकडे काही पुरावे नाहीत म्हणून आदित्य ठाकरे यांना क्लिन चीट दिली. त्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार होते. पण मागची तीन वर्षे आमचेच सरकार सत्तेवर होते.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनीही या प्रकरणी भाजपच्या विरुद्ध भूमिका घेतली आहे. मिटकरी म्हणाले, दिशा सालियन प्रकरणात इतक्या वर्षानंतर याचिका का दाखल करण्यात आली ? इतकी दिरंगाई का केली? राज्यात औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरुन वातावरण भरकटवले जात आहे. हे महाराष्ट्र समोरचे प्रश्न नाहीत. राजकीय लोकांनी याला हवा देऊ नये. विरोधक आणि सत्ताधारी यांनी दिशा सालियन प्रकरणात महाराष्ट्राचे मूळ प्रश्नांना बगल देऊ नये. प्रशांत कोरटकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे.
Shinde’s MLA supports Aditya Thackeray, Ajit Pawar’s MLA also questions the delay
महत्वाच्या बातम्या
- Disha Salian दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना आरोपी करण्याची तिच्या वडिलांची उच्च न्यायालयात याचिका
- Devendra Fadanvis : पुण्यात कोयता गँग नाही पण भाई होण्यासाठी अल्पवयीन मुलांकडून दहशत, मुख्यमंत्र्यांची माहिती
- Hemant Rasne : हिंजवडी दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याची आमदार हेमंत रासने यांची विधानसभेत मागणी
- Eknath Shinde : दोन्ही शिवसेनेत एक्स वॉर, एकनाथ शिंदे राजकीय कीड म्हणाल्याने आदित्य ठाकरेंवर सूर्याजी पिसाळ मनात पलटवार