विशेष प्रतिनिधी
मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या ट्विटवर शिंदे गटाने पलटवार करत थेट गाढवाची उपमा दिली आहे. संजय राऊत यांच्या दरराेज सकाळी नऊ वाजता पत्रकार परिषद घेण्यावरून बाेचरी टीका केली आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर खाटकाच्या लाकडावर उभ्या असलेल्या एका बोकडाचा फोटो पोस्ट करत त्याखाली ‘एसंशि’ अशी कॅप्शन दिले होते. शिंदे गटाला भारतीय जनता पक्ष बळी देण्याच्या तयारीत असल्याचा या पाेस्टचा अर्थ आहे. त्याला शिवसेनेने देखील चोख प्रत्युत्तर दिले आहे.
शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी एक ट्विट करून संजय राऊत यांच्यावर बाेचरी टीका केली आहे. गाढवाच्या समाेर पत्रकार त्यांचे बूम घेऊन उभे केल्याचा फाेटाे वापरला आहे. या ट्विटमध्ये म्हटले आहे की नवाच्या भोंग्याने संरारा दिली पुन्हा बांग. पुन्हा एकदा नको तिथे घातलीस बघ टांग. मालकाने टाकलेलं खाऊन बें बें रोज सकाळी करायचं.
जगातल्या कोणत्याही विषयावर मूर्खासारखं बरळायचं. तुमची अक्कल आणि ताकद दिसली सगळ्यांना निवडणुकात जनतेने भडकावली ना सणसणीत थोबाडात? आम्ही बकरे आहोत की वाघ ते ठरवलंय जनतेने मला वाटतं, जास्त भेकू नये गप्प बसावं गाढवाने… #उबाठा.
Shiv Sena Shinde faction counterattacks Sanjay Raut
महत्वाच्या बातम्या