विशेष प्रतिनिधी
नागपूर : Shiv Sena Shinde शिवसेना शिंदे गटात मंत्रिमंडळ विस्तारावरून नाराजीचा भडका उडाला आहे. माजी मंत्री असलेल्या अनेक बड्या नेत्यांना डच्चू देण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटातील नेते अस्वस्थ असल्याची बातमी समोर येत आहे. अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, दीपक केसरकर, विजय शिवतारे, प्रकाश सुर्वे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. त्यामुळे नेत्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. Shiv Sena Shinde
मंत्रिपदासाठी इच्छूक असलेल्या पवनी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांना मंत्रिपद न मिळाल्यानं त्यांनी काल उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी आपल्या शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा देखील दिला. त्यांचं पक्षात काहीच योगदान नाही अशांंना देखील मंत्रिपद मिळालं, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, त्यांना देखील मंत्रिपद मिळालं, जर मला जनतेला न्याय देता येत नसेल तर पदावर राहून काय उपयोग असा सवाल नरेंद्र भोंडेकर यांनी केला आहे.
दरम्यान नरेंद्र भोंडेकर यांच्याप्रमाणाचे विजय शिवतारे, प्रकाश सुर्वे आणि तानाजी सावंत हे देखील नाराज असल्याची चर्चा आहे, विजय शिवतारे यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. विश्वासात न घेता मंत्रिमंडळ विस्तार झाला. आता डीच वर्षांनी जरी मंत्रिपद मिळालं तरी मी घेणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे प्रकाश सुर्वे देखील नाराज आहेत.
मंत्रिपद न मिळाल्यामुळे तानाजी सावंत नाराज झाले आहेत. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाला न थांबता ते पुण्यातील बालाजी नगर येथील कार्यालयात परतले आहेत. माध्यमांसमोर येण्यासाठी तानाजी सावंत यांनी नकार दिला आहे. मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यानं शिवसेना शिंदे गटातील नेते नाराज आहे, आता त्यांची नाराजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कशी दूर करणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Shiv Sena Shinde group angered over cabinet expansion
महत्वाच्या बातम्या
- Bhujbal भुजबळ समर्थकांचे ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन
- Amit Shah : नक्षलवाद सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील तरुणांची अमित शहा यांनी घेतली भेट
- Mani Shankar Aiyar मणिशंकर अय्यर म्हणाले- गांधी परिवाराने माझे करिअर उद्ध्वस्त केले, सोनिया-राहुल 10 वर्षांत एकदा भेटले
- भाजपकडून होणार हे मंत्री, सर्व समाज घटकांना आणि राज्यातील विभागांना प्रतिनिधित्व