विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात एमपीएससीकडून घेण्यात येणाऱ्या सर्वच स्पर्धा परीक्षा competitive exams मराठीमध्ये घेण्याबाबत राज्य शासनाचे नियोजन असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
विधान परिषदेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) स्पर्धा परीक्षा मराठीमध्ये घेण्याविषयी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना यांनीमाहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी उत्तर देताना म्हटले की, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मराठी भाषेतून ही परीक्षा घेण्याबाबतची शक्यता तपासून धोरण ठरवण्याचे अंतरिम आदेश 1 सप्टेंबर 2022 रोजी दिले आहे. यावर मिलिंद नार्वेकर म्हणाले की, आपली महाभारतीच्या वेबसाईटवर जनरल अॅग्रीकल्चर आणि अॅग्रीकल्चर सायन्स या परीक्षा इंग्रजीमध्ये असल्याचे समोर येत आहे. याबाबत माहिती द्यावी, अशी मागणी मिलिंद नार्वेकर यांनी दिली.
राज्यातील अभियांत्रिकी आणि कृषी विषयक तांत्रिक पदांच्या परीक्षा मराठीमध्ये घेतल्या जात नसल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अभियांत्रिकी विषयांची पुस्तके मराठीमध्ये उपलब्ध नसल्यामुळे या परीक्षा इंग्रजी भाषेत घेतल्या जातात. पण, आता अभियांत्रिकी शिक्षणही मराठी भाषेत घेण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमाची पुस्तके आता मराठी भाषेत उपलब्ध होणार आहेत. त्या अनुषंगाने अभियांत्रिकी परीक्षांचा अभ्यासक्रम मराठी भाषेत तयार करून सर्व तांत्रिक पदांच्या स्पर्धा परीक्षाही मराठीमध्ये घेण्याचे नियोजन शासनाने केले असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात दिली.
State government plans to conduct all competitive exams in Marathi, Chief Minister assures
महत्वाच्या बातम्या
- धार्मिक व्देष पसरवून महाराष्ट्राचा तालीबान करण्याचा भाजपाचा डाव हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
- एचएसआरपी नंबर प्लेट लावण्याची मुदत ३ महिने वाढवा, आमदार शिरोळे यांची मागणी
- मल्हार मटणावरून जितेंद्र आव्हाड यांचे मटण पुराण
- खोक्या भोसले याला अखेर प्रयागराजमधून अटक