विशेष प्रतिनिधी
मुंबई : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामीच्या कटात खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार आणि माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांचा हात असल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या नेत्यांनी आत्मचिंतन करावे असा सल्लाही त्यांनी दिला.
जयकुमार गोरे यांनी आपल्याला आक्षेपार्ह फोटो पाठविल्याचे दावा एका महिलेने केला होता. एक कोटी रुपयाची खंडणी घेताना या महिलेला अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर लय भारी या यू ट्यूब चॅनलचा पत्रकार तुषार खरात यालाही अटक करण्यात आले आहे. या प्रकरणातले आरोपी थेट सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांच्या संपर्कात असल्याचे पुरावे सापडले, असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी विधानसभेत केला. ते म्हणाले, जयकुमार यांचे व्हिडिओ तयार करणारे आरोपी तुषार खरात अनिल सुभेदार आणि अन्य आरोपी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्यांच्या सतत संपर्कात होते त्यांचे शंभर कॉल आणि त्याचे रेकॉर्डिंग उपलब्ध झाले. ते प्रभाकर देशमुख यांच्या संपर्कात होते. आरोपींनी त्यांना व्हिडिओ पाठवले. प्रभाकर देशमुख यांची त्यांना उत्तरे आली.
त्या पलीकडे जाऊन एक गंभीर बाब समोर आली, ती म्हणजे खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांच्या देखील हे आरोपी संपर्कात होते आरोपींनी या दोघांनाही संबंधित व्हिडिओ पाठवले होते त्यांचे त्यांच्याशी बोलणे झाले होते याचे सगळे पुरावे आता पोलिसांच्या हाती आले आहेत. या सगळ्या गंभीर प्रकरणाची चौकशी आणि तपास पुढे नेऊन त्याची तड लावू. पण त्याही पेक्षा गंभीर बाब म्हणजे असे कोणालाही सार्वजनिक जीवनातून उठवण्यासाठी अशा प्रकारची बदनामी करणे योग्य आहे का?, याचे आत्मपरीक्षण त्यांनी केले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.
Supriya Sule, Rohit Pawar and Prabhakar Deshmukh in conspiracy to defame Minister Jayakumar Gore, Chief Minister’s shocking revelation in the Legislative Assembly
महत्वाच्या बातम्या
- Narayan Rane : नारायण राणे म्हणाले, दोन्ही पुत्र कर्तृत्ववान, मला माझ्या दोन्ही मुलांची घमेंड
- Supriya Sule : बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो, आणखी एक मंत्र्याचा बळी जाणार असल्याचा सुप्रिया सुळे यांचा गौप्यस्फोट
- Purandar Airport, : पुरंदर विमानतळासाठी एक पाऊल पुढे, सात गावांमधील क्षेत्र औद्योगिक म्हणून जाहीर
- Jayakumar Rawal : मंत्री जयकुमार रावल यांनी शासनाची फसवणूक करून दोन कोटी 65 लाख रुपये लाटले, अनिल गोटे यांचा आरोप