विशेष प्रतिनिधी
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख साहेब यांच्या ‘द डायरी ऑफ अ होम मिनिस्टर’ या पुस्तकावर बंदी घातल्यास अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आवाज दडपला जाईल, हे स्पष्ट आहे. पण या सरकारने लक्षात ठेवायला पाहिजे की, त्यांनी कितीही प्रयत्न केले तरीही सत्याचा आवाज कधीही कुणाला कायमस्वरूपी दडपता येत नाही. अंतिम विजय सत्याचाच होतो, असे राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुनावले आहे.
सुप्रिया सुळे यांनी एक्स या साेशल मीडिया प्लॅटफाॅर्मवरळ एक पाेस्ट टाकून हा आराेप केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, माजी गृहमंत्री अनिल देशमुख साहेब यांच्या ‘द डायरी ऑफ अ होम मिनिस्टर’ या पुस्तकावर बंदी घालण्याचा विचार महायुती सरकार करत असल्याचे समजते, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. या पुस्तकात त्यांनी अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी ‘डायरी ऑफ अ होम मिनिस्टर’ हे पुस्तक प्रकाशित केले. त्यावेळी राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. आपल्या खांद्यावर बंदूक ठेवून महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांना गोवण्याचा कट रचण्यात आल्याचा दावा करत त्यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. आता त्याच पुस्तकासंदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख साहेब यांच्या 'द डायरी ऑफ अ होम मिनिस्टर' या पुस्तकावर बंदी घालण्याचा सरकार विचार करीत असल्याचे समजते. या पुस्तकात त्यांनी अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. या पुस्तकावर बंदी घातल्यास अभिव्यक्तीचा आवाज दडपला जाईल हे स्पष्ट आहे. पण या सरकारने लक्षात ठेवायला… pic.twitter.com/6C650eRMsO
— Supriya Sule (@supriya_sule) April 5, 2025
तत्कालीन महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी माझ्यावर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दबाव टाकला गेला होता. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपला अत्यंत जवळचा माणूस माझ्याकडे पाठवला होता. त्याने देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझे अनेकदा बोलणे करून दिले होते. त्यांनी माझ्याकडे एक लिफाफा पाठवला होता, त्यामधील चार मुद्द्यांचे प्रतिज्ञापत्र करून देण्यास मला सांगितले. ते जर मी करून दिले असते तर तेव्हा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार हे अडचणीत आले असते, असा दावा त्यांनी पुस्तकात केला आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीसाठी माझ्याकडे पैसे मागितले, असे पहिले शपथपत्र होते. दुसऱ्या शपथपत्रात आदित्य ठाकरे यांच्यावर दिशा सालियन मृत्यूप्रकरणी गंभीर आरोप होते. तिसऱ्या प्रतिज्ञापत्रात अनिल परब यांच्यावरील दापोलीतील साई रिसॉर्टसंदर्भातील आरोप होते, तर चौथ्या प्रतिज्ञापत्रात अजित पवार यांनी मला गुटखा व्यावसायिकांकडून वसुली करण्यास सांगितले, असे नमूद केले होते. या चारही प्रतिज्ञापत्रांवर मी स्वाक्षरी करावी तसेच तसा जबाब तपास यंत्रणांसमोर द्यावा, या बदल्यात परमबीर सिंग यांच्या आरोप प्रकरणातून सुटका होईल, असे संबंधित व्यक्तीने मला सांगितले होते, असा गौप्यस्फोट अनिल देशमुख यांनी केला होता.
Supriya Sule told the government from Anil Deshmukh’s book
महत्वाच्या बातम्या
-
मराठीचा आग्रह धरा, पण आंदोलन थांबवा, राज ठाकरे यांचे मनसैनिकांना आदेश
-
Sanjay Raut संजय राऊत यांनी सोडली टीकेची पातळी, मोदी शहांचा मियाँ म्हणून उल्लेख
-
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा निर्णय, इमर्जन्सीमध्ये अनामत रक्कम न घेण्याचा ठराव
-
Rahul Gandhi : आता काेणी केली बाेलती बंद, वक्फ विधेयकावर चर्चा सुरू असताना राहुल गांधींचे मौनव्रत