विशेष प्रतिनिधी
मुंबई :Suresh Dhas आमदार सुरेश धस महायुतीत मिठाचा खडा टाकत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धस यांना आवर घालावा.आमचा गृह खात्यावर विश्वास आहे. पण धस आमच्या नेत्यावर प्रश्न उपस्थित करु शकतात तर त्यांना जाणीव करुन द्यायची आहे की आम्ही सुद्धा तुमच्या नेत्यावर प्रश्न उपस्थित करु शकतो, असा इशारा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी दिला आहे.
ते म्हणाले, काल परभणीत झालेल्या सभेत आमदार सुरेश धस यांनी अजित पवार यांच्यावर विनाकारण टीका केली. त्यावर मी ट्वीट केलं आहे. सुरेश धस यांनी अजित पवारांना प्रश्न विचारला की क्या हुआ तेरा वादा? मला अजित पवारांवर विश्वास आहे की जर कोणी दोषी असेल तर त्यावर ते कारवाई करतील सुरेश धस जाणीवपूर्वक महायुतीत मिठाचा खडा टाकत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझी विनंती आहे की सुरेश धस यांना आवर घाला
सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकातील
(एसआयटी) अधिकारी महेश विघ्ने यांच्याबाबत चव्हाण म्हणाले, आरोपीचा कोणी जवळचा एसआयटीमध्ये असेल तर त्याला तत्काळ दूर करा. याचं राजकारण करू नका. आपली भूमिका हीच असली पाहिजे की त्यांना न्याय मिळायला हवा राजकारण करू नका.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ज्येष्ठ नेते यावर बोलतील.. जर ते आरोपी आढळले तर ज्येष्ठ नेते राजीनामा घेतील असे सांगून चव्हाण म्हणाले, आमचा गृह खात्यावर विश्वास आहे. पण सुरेश धस आमच्या नेत्यावर प्रश्न उपस्थित करु शकतात तर त्यांना जाणीव करुन द्यायची होती आम्ही सुद्धा तुमच्या नेत्यावर प्रश्न उपस्थित करु शकतो. महाराष्ट्रात लोकभावना तीव्र आहे जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी सर्वांची भावना आहे. महायुतीचे नेते कोणत्याही गुन्हेगाराला सोडणार नाहीत. आरोपीचा आणि राष्ट्रवादीचा काही संबंध नाही, जाणीवपूर्व त्याला आमच्याशी जोडण्याचा प्रयत्न केला जातोय.
स्व.संतोष देशमुख यांच्या हत्येवरून आ.सुरेश अण्णा धस जाणीव पूर्वक राजकारण करत आहेत.परभणीच्या सभेत अजित दादांना क्या हुआ तेरा वादा …म्हणून दादांना प्रश्न विचारणाऱ्या सुरेश अण्णा ला माझा प्रश्न आहे आरोपी स्वतः होऊन आत्मसमर्पण करत आहेत मग गृह खातं झोपा काढत आहे का ? निष्पक्ष चौकशी…
— Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण) (@surajvchavan) January 5, 2025
Suraj Chavan gave this warning to MLA Suresh Dhas
महत्वाच्या बातम्या
- विखे पाटील यांनी सांगितले कधी होणार धनंजय मुंडे यांचा राजीनामा
- Girish Mahajan : काँग्रेससह सर्वच पक्षातील नेते येण्यासाठी नंबर लावून बसलेत, गिरीष महाजन यांचा मोठा दावा
- Narahari Zirwal: दैवताला सोडून जाताना लाज वाटली नाही का?; जितेंद्र आव्हाड यांचा नरहरी झिरवळ यांना सवाल
- Chief Minister Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांचा बनावट व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांची ओळख पटली