विशेष प्रतिनिधी
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सीबीआयकडून कोर्टात क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला आहे. सुशांत सिंहचा मृत्यू ही आत्महत्याच असल्याचं सीबीआयच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे या प्रकरणात संशय असलेल्या रिया चक्रवर्तीला क्लीन चिट मिळाली आहे.
सुशांत सिंह राजपूत 14 जून 2020 रोजी वांद्रे येथील त्याच्या घरी मृतावस्थेत आढळला होता. सुशांत सिंह राजपूतची हत्या नव्हे तर आत्महत्याच असल्याचे समोर आले आहे. कुठलाही पुरावा न सापडल्याने सीबीआयने तपास बंद केला आहे. सीबीआयने तब्बल 4 वर्षे 4 महिन्यांनी क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे.
सुशांत सिंह राजपूत याने 14 जून 2020 मध्ये सुशांत याने मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. करीयर यशाच्या शिखरावर असताना अभिनेत्याने स्वतःला संपवलं. त्यामुळे त्याचे मृत्यूचे गूढ वाढले होते. गेली साडेचार वर्षे तपास सुरू होता. अखेर सीबीआयने क्लोजर रिपोर्ट मुंबई कोर्टात दाखल केला असून अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांना क्लीन चिट देण्यात आली आहे.
रिया चक्रवर्ती सुशांत सिंह राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र, दोघांनीही आपले नाते अधिकृत केले नव्हते. 2020 मध्ये, 14 जून रोजी सुशांत त्याच्या वांद्रे येथील फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला तेव्हा सर्वत्र खळबळ उडाली होती. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात ड्रग्जचा अँगलही समोर आला. तपासात एनसीबी आणि ईडीच्या रडारवर रिया चक्रवर्तीही आली. सुशांतच्या कुटुंबीयांनी रियावर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणात अभिनेत्री मुख्य आरोपी मानली जात होती, तेव्हा तिला एक महिना भायखळा तुरुंगात काढावा लागला होता. अखेर सीबाआयने या प्रकरणी रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांना दिली क्लीन चिट देण्यात आली आहे.
सीबीआयने फाइलचा क्लोजर रिपोर्ट मुंबई कोर्टात दाखल केला आहे. सुशांतचा 2020 मध्ये मृत्यू झाला. सीबीआयने तब्बल 4 वर्षे 4 महिन्यांनी क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. सीबीआयने रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांना क्लीन चिट दिली आहे.
सीबीआयच्या अहवालात काय म्हटले आहे की, सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली होती, त्याला आत्महत्येसाठी कोणीही जबरदस्ती केली नाही. रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाला क्लीन चिट मिळाली.या प्रकरणी कोणताही गुन्हेगारी अँगल किंवा ‘फाऊल प्ले’ आढळला नाही.फॉरेन्सिक टीमनेही हत्येची शक्यता नाकारली. सोशल मीडिया चॅट्स अमेरिकेत पाठवून तपास केला. त्यामध्ये छेडछाड केल्याचा कोणताही पुरावा सापडला नाही.
दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चर्चा पुन्हा सुरू झाली असतानाच सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूसंदर्भात हा खुलासा झाला आहे. शनिवारी सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सीबीआयने दाखल केलेल्या अंतिम अहवालात मृत्यूचे खरे कारण आत्महत्या असल्याचे सांगण्यात आले आहे.
सीबीआयच्या तपासानुसार सुशांतच्या मृत्यूसाठी कुणीही जबाबदार नाही. 14 जून 2020 रोजी वांद्रे येथील घरात सुशांतसिंह मृतावस्थेत आढळला होता. सुरुवातीला हे प्रकरण आत्महत्याच वाटत होते, पण नंतर या प्रकरणाने राजकीय वळण घेताच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. दुसरीकडे दिशा सालियन मृत्यू प्रकरणात तिचे वडील सतीश सालियन यांनी केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात 2 एप्रिलला सुनावणी होणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, सीबीआयने मुंबईच्या एका विशेष कोर्टात सीबीआय क्लोजर सादर केला. सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट पाहून तपासाचे पुढील आदेश दिले जाणार आहेत. सुशांतच्या आत्महत्येनंतर बिहार पोलिसांनी तपास हातात घेतला होता.
सुशांतच्या वडिलांनी पाटणा येथे त्याला प्रवृत्त केल्याने आत्महत्या केल्याची तक्रार नोंदवली. एम्सच्या फोरेन्सिक पथकाने विष देऊन आणि गळा दाबून हत्या केल्याचे दावे फेटाळले. या प्रकरणात सुशांतसिंह राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि त्याच्या जवळच्या लोकांचे जबाब नोंदवण्यात आले होते. सुशांतसिंह राजपूतचे मेडिकल रिपोर्ट देखील एकत्र केले होते. सुशांतसिंह राजपूतच्या वडिलांनी आरोप केला होता की, रिया चक्रवर्तीने तिच्या कुटुंबीयाच्या साथीने पैशांसाठी सुशांतचा छळ केला. मात्र, सुशांतच्या वडिलांचे आरोप रिया चक्रवर्तीने फेटाळले होते. या प्रकरणी रियासहित अनेक कलाकारांशी चौकशी झाली होती. सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात रियाला महिनाभर तुरुंगात राहावं लागलं. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे पोहोचल्यानंतर त्यांनी आत्महत्या आणि हत्या दोन्ही बाजूने केला.
Sushant Singh Rajput’s suicide is not murder, CBI files closure report in court after four and a half years
महत्वाच्या बातम्या
- Disha Salian दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना आरोपी करण्याची तिच्या वडिलांची उच्च न्यायालयात याचिका
- Devendra Fadanvis : पुण्यात कोयता गँग नाही पण भाई होण्यासाठी अल्पवयीन मुलांकडून दहशत, मुख्यमंत्र्यांची माहिती
- Hemant Rasne : हिंजवडी दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याची आमदार हेमंत रासने यांची विधानसभेत मागणी
- Eknath Shinde : दोन्ही शिवसेनेत एक्स वॉर, एकनाथ शिंदे राजकीय कीड म्हणाल्याने आदित्य ठाकरेंवर सूर्याजी पिसाळ मनात पलटवार