विशेष प्रतिनिधी
मुंबई : स्टॅंडअप कॉमेडियन कुणाल कामराची वादग्रस्त कविता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे Sushma Andhare यांनी पुन्हा म्हटली हाेती. याचा संदर्भ देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा सभागृहाच्या सन्मानावरून टीका केली. या टीकेला उत्तर देणारे पत्र सुषमा अंधारे Sushma Andhare यांनी लिहिले आहे. भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांना त्यांनी पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे.
ज्या सभागृहामध्ये एसएम जोशी, कॉ. डांगे, यशवंतराव चव्हाण, विलासराव देशमुख यांच्यासारख्या लोकांची भाषणे ऐकायला सभागृह तुडुंब भरायचे. त्या सभागृहात नीतेश राणे, चित्रा वाघ, संजय शिरसाट यासारख्या लोकांनी त्याचे पावित्र्य हरवून टाकले आहे. याचे तुम्हाला जराही वैषम्य वाटत नाही, ही केवढी मोठी शोकांतिका म्हणावी? असे म्हणत महायुतीच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे.
सुषमा अंधारे यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पत्र लिहिण्याचे कारण की आज पुन्हा सभागृहात आपण माझ्याबद्दल बोललात. पण आपल्याला उत्तर द्यायला मी सभागृहात नाही. ही माझी तांत्रिक अडचण आहे. म्हणून आपल्याला या पत्राद्वारे उत्तर देणे माझी जबाबदारी समजते. तसे सभागृहात आपण पहिल्यांदा माझ्याबद्दल बोललेला नाहीत. आपल्यासह या सभागृहातल्या भल्या भल्या सदस्यांनी याआधीही माझ्यावर बोलून, ‘आपण कालबाह्य झालेलो नाहीत, आपली उपयोगीता अजूनही शिल्लक आहे हे आपापल्या पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवण्याचा आणि त्यांचे लागूनचालन करण्याचा प्रयत्न केला आहे.”
या पत्रात पुढे म्हटले आहे की, “आज प्रचंड पोटतिडकीने आपण सभागृहाच्या आदर सन्मानाबाबत भाष्य करत होतात. आनंद झाला आणि आश्चर्यही वाटले. आनंद यासाठी की चला सभागृहाच्या मानसन्मानाबद्दल थोडी का होईना आपल्याला काळजी वाटते. आश्चर्य याचे की, हा सभागृहाचा मानसन्मान आपल्याच पक्षाच्या सदस्यांनी शेकडो वेळा धुळीस मिळवला तेव्हा आपली ही अतिसंवेदनशीलता नेमकी कुठे हरवली होती?” अनवनीत राणाने या राज्याच्या तात्कालीन मुख्यमंत्री असणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलताना ‘तुमच्यात दम आहे का’ ही भाषा वापरणे सभागृहाचा आणि मुख्यमंत्रिपदाचा मान वाढवणारी होती की मान खाली घालणारी होती?”
“सभागृहाचे सदस्य असणारे सदाभाऊ खोत यांनी मारकडवाडीमध्ये या शतकातील नेता म्हटले तरी चालेल ज्या नेत्याला आपले नेते नरेंद्र मोदी गुरुस्थानी मानतात त्या शरद पवार यांच्या आजारावर अत्यंत हिनकस टिप्पणी केली तेव्हा त्यांना संस्कार सांगायला आपण का विसरलात?” आजच्याच वक्तव्यामध्ये संजय शिरसाट खासदार संजय राऊत यांच्या बद्दल बिनलाजे शब्द वापरतात, तर परिणय फुके ह** शब्द वापरतात हे सभागृहाच्या कोणत्या मर्यादित बसते? माझ्या पक्षातच सोडा पण सभागृहातही ज्येष्ठ असणारे माजी मंत्री अनिल परब यांना अत्यंत असभ्य आणि बीभत्स हातवारे करत तुमच्या पक्षातल्या एक बाई पायाला 56 बांधून फिरण्याची भाषा करतात. यावर आज सभागृहात तुम्ही चकार शब्दाने ही का बोलला नाहीत?” असा सवाल अंधारे यांनी केला आहे.
Sushma Andhare targets Chitra Wagh again, writes letter to Chief Minister
महत्वाच्या बातम्या
- Narayan Rane : नारायण राणे म्हणाले, दोन्ही पुत्र कर्तृत्ववान, मला माझ्या दोन्ही मुलांची घमेंड
- Supriya Sule : बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो, आणखी एक मंत्र्याचा बळी जाणार असल्याचा सुप्रिया सुळे यांचा गौप्यस्फोट
- Purandar Airport, : पुरंदर विमानतळासाठी एक पाऊल पुढे, सात गावांमधील क्षेत्र औद्योगिक म्हणून जाहीर
- Jayakumar Rawal : मंत्री जयकुमार रावल यांनी शासनाची फसवणूक करून दोन कोटी 65 लाख रुपये लाटले, अनिल गोटे यांचा आरोप