विशेष प्रतिनिधी
मुंबई : दिशा सालियन प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आल्याने शिवसेना ठाकरे गटाच्या नेते भांबावून गेले आहेत. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपच्या आमदार चित्र वाघ यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली आहे.
दिशा सालियन मृत्यू प्रकरण समोर आल्यानंतर याचे पडसाद हे विधिमंडळातही पाहायला मिळाले. भाजप आमदार चित्रा वाघदेखील चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या. अनिल परब यांनी संजय राठोड यांचं नाव घेतल्याने चित्रा वाघ संतापल्या. अनिल परब यांच्यावर निशाणा साधताना चित्रा वाघ म्हणाल्या की, संजय राठोड मंत्रिमंडळात का आहेत? याचे उत्तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.
जेव्हा एखाद्या बाईला तर्काने उत्तर देणं शक्य नसतं तेव्हा तिच्या मर्मावर वार केला जातो.दुर्देवानं आज विधानपरिषदेच्या सभागृहात याची प्रचिती आली.
दिशा सालियनच्या SIT वर प्रश्न उपस्थित केला तेव्हा उबाठा गटाच्या अनिल परबांनी त्यांच्या कमकुवत मानसिकतेचं प्रदर्शन केलं…
पण लक्षात… pic.twitter.com/shm3doFKOy
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) March 20, 2025
त्यामुळे संजय राठोड यांना का क्लिनचिट दिली? याचे उत्तर उद्धव ठाकरेंना विचारा. तुमच्यात हिंमत असेल तर विचारा त्यांना. तुम्ही असाल पोपट पंडित, पण माझ्या कुटुंबानं दोन वर्ष जे सहन केलं ते कधीही विसरू शकत नाही. खरंतर तुमच्यासारखे 56 परब पायाला बांधून फिरते. आम्ही वशिल्याने याठिकाणी आलेलो नाही.
शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी यावरून चित्रा वाघ यांच्यावर ट्विटरवर टीका केली. त्या म्हणाल्या आहेत की सभागृहाची सुसंस्कृत परंपरा गरिमा धाब्यावर बसवत एक बाई अत्यंत विचित्र आवाजात किंचाळत म्हणाल्या 56 जण पायाला बांधून फिरते. ही भाषा कोणत्या शाळा महाविद्यालयात शिकवली जाते, हे माहीत नाही. पण हे दरवेळी सांगायची गरज काय? त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख सांगताना लोक यापेक्षा जास्त आकडा सांगतात!”
https://twitter.com/andharesushama/status/1902709221218480191
Sushma Andhare’s low-level criticism of Chitra Wagh
महत्वाच्या बातम्या
- Disha Salian दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना आरोपी करण्याची तिच्या वडिलांची उच्च न्यायालयात याचिका
- Devendra Fadanvis : पुण्यात कोयता गँग नाही पण भाई होण्यासाठी अल्पवयीन मुलांकडून दहशत, मुख्यमंत्र्यांची माहिती
- Hemant Rasne : हिंजवडी दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याची आमदार हेमंत रासने यांची विधानसभेत मागणी
- Eknath Shinde : दोन्ही शिवसेनेत एक्स वॉर, एकनाथ शिंदे राजकीय कीड म्हणाल्याने आदित्य ठाकरेंवर सूर्याजी पिसाळ मनात पलटवार