विशेष प्रतिनिधी
बंगळूरु: Devendra Fadnavis महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय करत आहेत, त्यांचे विचार, त्यांची धोरणे, त्यांची दृष्टी आणि मुंबईतील गुंतवणूक पाहा आणि बेंगळुरूसाठी आमच्या सरकारच्या दृष्टीकोनाकडे पाहा असे म्हणत इन्फोसिसचे माजी सीएफओ मोहनदास पै कर्नाटकच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना देवेंद्र फडणवीस यांचा आदर्श घेण्याचा सल्ला दिला.Devendra Fadnavis
मोहनदास पै यांनी कर्नाटक सरकारवर जोरदार टीका करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. कर्नाटक सरकारची धोरणे मागास आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांना महाराष्ट्राच्या आर्थिक धोरणांमधून धडा घेण्याचे आवाहन केले.
मोहनदास पै म्हणाले, आपले कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी मोफत योजना आणि सांप्रदायिक धोरणांपेक्षा महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाचा, विकासाचा, गुंतवणुकीच्या धोरणांचा अभ्यास करावा आणि कर्नाटकला एक उत्तम भविष्य द्यावे. कर्नाटकसाठी आमच्या मुख्यमंत्र्यांचा दृष्टिकोन मागासलेला आहे, आपल्या तरुणांना जो आवश्यक आहे तो नाही. याबद्दल खूप दुःख आहे”, असे मोहनदास पै यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
मोहनदास पै यांनी पुढे कर्नाटकच्या आर्थिक दृष्टिकोनाची तुलना महाराष्ट्राच्या आक्रमक विकास धोरणांशी केली, यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. “फडणवीस काय करत आहेत, त्यांचे विचार, त्यांची धोरणे, त्यांची दृष्टी आणि मुंबईतील गुंतवणूक पाहा आणि बेंगळुरूसाठी आमच्या सरकारच्या दृष्टीकोणाकडे पाहा. हे खूप दुःखद!”
महाराष्ट्र सरकारने आगामी आर्थिक वर्षासाठी ७,००,०२० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यानंतर मोहनदास पै यांनी एक्सवर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात औद्योगिक विस्तार, पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीवर भर देण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी ४० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि ५० लाख रोजगार निर्माण करण्यासाठी नवीन औद्योगिक धोरण जाहीर केले आहे
मोहनदास पै हे एक भारतीय उद्योजक आणि गुंतवणूकदार आहेत. त्यांना भारतीय तंत्रज्ञान आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठीही ओळखले जाते. त्यांनी इन्फोसिसचे मुख्य वित्तीय अधिकारी म्हणूनही काम केले आहे. इन्फोसिसमधील त्यांच्या कार्यकाळात, त्यांनी कंपनीच्या आर्थिक धोरणाला आणि वाढीला आकार देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
Take Devendra Fadnavis as an example, advises former Infosys CFO Mohandas Pai to Karnataka CM and Deputy CM
महत्वाच्या बातम्या
- धार्मिक व्देष पसरवून महाराष्ट्राचा तालीबान करण्याचा भाजपाचा डाव हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
- एचएसआरपी नंबर प्लेट लावण्याची मुदत ३ महिने वाढवा, आमदार शिरोळे यांची मागणी
- मल्हार मटणावरून जितेंद्र आव्हाड यांचे मटण पुराण
- खोक्या भोसले याला अखेर प्रयागराजमधून अटक